बलसिद्धी अर्बन बँकेच्या चेअरमन पदी छाया येवले,तर व्हाइस चेअरमन पदी मयुरी भाकरे, यांची बिनविरोध निवड
बलसिद्धी अर्बन महिला क्रिकेट सोसायटी लिमिटेड विहामांडवा येथे दी.२७ रोजी बलसिद्धी अर्बन महिला संचालक मंडळाची सभा माननीय सहायक निबंधक सहकारी संस्था पैठण यांची अधीसूचना जा. क्र. ३६४ दी.२१/३/२५ अनुवय संस्थेच्या चेअरमन व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक पार पडली. निवडणूक अध्यक्ष अधिकारी म्हणून टी. व्ही.खिस्ती, निर्वाचन अधिकारी पतसंस्था पैठण यांनी काम पाहिले त्यामध्ये चेअरमन पदासाठी सौ छाया ज्ञानोबा येवले,तर व्हाइस चेअरमन पदी सौ मयुरी भाकरे,याची बिनविरोध निवड करण्यात आली.व पुढील प्रमाणे संचालक मंडळाची निवड करण्यात आली ज्या मध्ये
खोबरे पूजा शुभम, देशमाने सुनिता राजेंद्र, डुकरे मनीषा सुनील, कुलकर्णी प्रतिभा बाळकृष्ण, जाधव ज्योती प्रभूराम, श्वेता बप्पासाहेब येळे,सराफ गायत्री कौस्तुभ, सौ रेखा किशोर धायकर,यांचा समावेश आहे.