“जीएसटी’ मुळेच शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला ; हेक्टरी १५ हजाराची वाढ.”  ‘कशी परवडणार शेती म्हणून शेतकऱ्यांना परतावा  देण्याची मागणी.’

0
52
“जीएसटी’ मुळेच शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला ; हेक्टरी १५ हजाराची वाढ.”
 ‘कशी परवडणार शेती म्हणून शेतकऱ्यांना परतावा  देण्याची मागणी.’
सौयगाव /  प्रतिनिधी /शेत तयार करण्यापासून जमिनीत बीज पेरण्यासोबतच शेतमाल विक्रीपर्यंत लागणाऱ्या वेगवेगळ्या करांनी शेतकऱ्याचे पूर्णतः अर्थकारण बिघडून टाकले आहे.रासायनिक खते, कीटकनाशके,शेती औजारे यांच्यासह इतर गोष्टीवर  ५ ते २८ टक्क्यापर्यंत जीएसटी आकारला जात असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात हेक्टरी जवळपास १५ हजाराची वाढ झाल्यामुळे शेती व्यवसाय न परवडणारा झाला आहे.अगोदरच वातावरणातील बदल व नैसर्गिक आपत्तीमुळे एवढा मोठा खर्च लावुनही घरात पीक येणार की नाही याची शास्वती नसतांना जीएसटी खीशातून जात असेल तर शेतकरी या व्यवसायात तग धरेल तरी कसा? असा प्रश्न उपस्थित होत असतांना शेती संबंधीच्या वस्तुंना जीएसटीमुक्त करावे किंवा त्याचा परतावा शेतकऱ्यांना देण्यात यावा अशी मागणी सर्व स्तरातून होऊ लागली आहे.
     काही दिवसापूर्वी खुद्द कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनीही जीएसटीमुळे उत्पादन खर्चात वाढ होते याची कबुली दिली आहे.वास्तविक व्यापाऱ्यांकडून वसूल केलेल्या जीएसटीचा परतावा शासनाकडून मिळतो.मात्र शेरकऱ्यांकडून वसूल केलेला जीएसटी गंगाजळीला जमा होतो.यासाठी एकतर शेतकऱ्यांना जीएसटीच्या कक्षाबाहेर काढावे किंवा त्यांना परतावा द्यावा अशी पण मागणी आता होऊ लागली आहे.
चौकट ;
‘जीएसटी मुळे असा वाढतो खर्च.’
साहित्य              हेक्टरी(GST टक्के)      रुपये
रासायनिक खते –    ५० हजार(५%)         २५००
कीटक व तणनाशके – ३० हजार(१८%) –  ५४००
द्रव्य खते व टॉनिक –  १० हजार(१८%)  –  १८००
पाईप,स्पेअर पार्ट व डिझेल- १२ ते २८% – ४५००
चौकट ;
‘अशी होते आकारणी ‘
•ट्रॅक्टर स्पेअर पार्ट – २२ ते २८ टक्के
•कीटकनाशके  – १८ टक्के
•तणनाशके  – १८ टक्के
•शेती अवजारे  -१२ ते १८ टक्के
•शेती पंप  – १८ टक्के
•फवारणी पंप – १२ ते १८टक्के
•पिव्हीसी पाईप –  १२ ते १८ टक्के
•सेंद्रिय खते  – १२ टक्के
•रासायनिक खते  – ५ टक्के
•डिझेल  – ५ टक्के.
प्रतिक्रिया ;
‘उत्पादन खर्च कमी होऊन पिकाला आधारभाव मिळाल्याशिवाय शेती किफायतशीर होणे अशक्य आहे,शेतकऱ्यांची शेती जीएसटीमुक्त करण्यासाठी आगामी काळात ग्राम संघर्ष समिती शेतकरी यावर लढा उभारणार आहे.’
•, भागवत थोटे शेतकरी
प्रतिक्रिया ;
 ‘शेतीपूरक वस्तूवरील जीएसटी पूर्ण माफ केला तर शेतकरी थोडाफार फायद्यात येऊ शकतो,पण सद्याचे शासनाचे धोरण बघता एका हाताने घेणे व दुसऱ्या हाताने दामदुप्पट काढणे असे काहीसे सुरु आहे.’
अरूण सोहणी•, प्रगतीशील शेतकरी, . सोयगाव