Tuesday, March 31, 2026
Homeऔरंगाबादकडोळी येथे ८४ वा अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात सुरू

कडोळी येथे ८४ वा अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात सुरू

कडोळी येथे ८४ वा अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात सुरू

सेनगाव/प्रतिनिधी/ सेनगाव तालुक्यातील कडोळी येथे पंचक्रोशीतील भजनी मंडळी व भाविकांच्या उपस्थितीत अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या भक्तिभावात सुरू आहे. कडोळी भगवती, माझोड तपोवन, गारखेडा, गोरेगाव, केंद्रा बुद्रुक, माहेरखेडा, हिवरा, मन्ना, पिंपरी, चौंडी बुद्रुक आदी पंचक्रोशीतील भजनी मंडळी व नागरिकांचा या सप्ताहात मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभत आहे.

कडोळी येथील प्रसिद्ध रमते राम महाराज संस्थान येथे सुमारे ८३ वर्षांपूर्वी सप्ताह परंपरेची सुरुवात झाली होती. तेव्हापासून अखंडपणे ही परंपरा सुरू असून यंदा ८४ वा अखंड हरिनाम सप्ताह कडोळी ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

या सप्ताहाची सांगता सोमवार, दिनांक ०८ एप्रिल २०२४ रोजी होणार असून, यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन संतराम महाराज संस्थान, परळी येथे करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन रमते राम महाराज संस्थानचे अध्यक्ष, सर्व कार्यकारी मंडळ व कडोळी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments