Sunday, March 29, 2026
Homeऔरंगाबाद" 69वी राष्ट्रीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धां 2025-26यशस्वी संपन्न"

” 69वी राष्ट्रीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धां 2025-26यशस्वी संपन्न”

प्रति,

मा. जिल्हा माहिती अधिकारी,/ सर्व संपादक, सर्व दैनिके

छत्रपती संभाजीनगर.

विषय : वृत्तपत्रिय टिप्पणी प्रसिध्दीस देणेबाबत.

                उपरोक्त विषयी विनंती करण्यात येते की, या सोबतची वृत्तपत्रिय टिप्पणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील स्थानिक दैनिकातून विनामुल्य प्रसिध्दीस देवुन शासकीय क्रीडा उपक्रमास सहकार्य करावे, ही विनंती.

” 69वी राष्ट्रीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धां 2025-26यशस्वी संपन्न

महाराष्ट्र शासनाच्या, क्रीडा व युवक सेवा, संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, भारतीय खेळ महासंघ, जिल्हा क्रीडा परिषद, छत्रपती संभाजीनगर व जिल्हा क्रीडा अधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 69वी राष्ट्रीय शालेय तलवारबाजी (14 वर्षे मुले व मुली) क्रीडा स्पर्धां 2025-26 चे आयोजन दिनांक 21 ते 25 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये विभागीय क्रीडा संकुल, छत्रपती संभाजीनगर सुरू आहेत.

आजच्या शेवटच्या दिवशी दिनांक 25/12/2025 रोजी ईप्पी, फॉईल व सेबर या तलवारबाजी या खेळ प्रकारामध्ये वैयक्तीक आणि सांघिक स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात प्रथम, द्वितीय व तृतीय प्राविण्यानुसार गुणांकण करण्यात आले. त्यानुसार सर्वसाधारण विजेतेपदक घोषित करण्यात आले. त्यांना श्रीमती सुनीता शर्मा, उद्योजक, आदित्य ट्रेडर्स गंगापूर यांचे शुभहस्ते सर्वसाधारण अजिंक्यपद 14 वर्षे मुले : प्रथमस्थान हरीयाणा, द्वितीयस्थान डी.ए.व्ही. संघटना, तृतीयस्थान पंजाब 14 वर्षे मुली : प्रथमस्थान हरीयाणा, द्वितीयस्थान महाराष्ट्र, तृतीयस्थान डी.ए.व्ही. संघटना यांना पारितोषिक देऊन सन्मानित केले. या प्रसंगी मा.श्री. बाजीराव देसाई, जिल्हा क्रीडा अधिकारी, छत्रपती संभाजीनगर, मा. श्री. दिपक कनोजिया, एस.जी.एफ.आय. निरीक्षक, शरद कुमार एस.जी.एफ.आय.,डॉ. उदय डोंगरे, स्पर्धा निरीक्षक तथा सचिव महाराष्ट्र राज्य फेंसिग संघटना, महाराष्ट्र संघाच्या संघव्यवस्थापक श्रीमती सुजाता गुल्हाणे, क्रीडा मार्गदर्शक मुले-श्री. तुषार आहेर व मुली क्रीडा मार्गदर्शक श्रीमती शिल्पा मोरे, श्री. किशन सर, साई तलवारबाजी वरीष्ठ क्रीडा मार्गदर्शक, श्री. राजीव भारद्वारज, आंतरराष्ट्रीय पंच आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी, तलवारबाजी खेळाचे राष्ट्रीय पंच अधिकारी तसेच भारतातील सर्व राज्यातील उत्कृष्ठ खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, संघव्यवस्थापक उपस्थित होते.

            स्पर्धेतील सामन्याची तांत्रिक बाजू राष्ट्रीय व राज्य तलवारबाजी संघटना सांभाळली. त्यासाठी विविध राष्ट्रीय पंच परीक्षा पात्र पंच व तांत्रिक अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली होती.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मा. उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी व स्पर्धा संघटनांचे अधिकारी यांचे सहकार्याने प्रयत्न करण्यात येत आहे. असे श्री. बाजीराव देसाई, जिल्हा क्रीडा अधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांनी कळविले आहे.

-बाजीराव देसाई

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments