5 आक्टोंबर आंतरराष्ट्रीय शिक्षक दिवस
प्रति माननीय संपादकजी
विषय:- गुरू-शिष्याचे नाते अतूट असावे.
जगातील शिक्षकांसाठी 5 आक्टोंबर सन्मानजनक दिन आहे.शिक्षकांच्या प्रती सहयोग व आत्मविश्वास वाढावा आणि भविष्यातील पिढीची आवश्यकता पुर्ण व्हावी याकरिता शिक्षकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने या विशिष्ट दिवसाला आगळेवेगळे महत्व आहे.जगातील शिक्षकांना योग्य मार्गदर्शन मिळावे व शिक्षणामध्ये नवीनीकरण व आधुनिकीकरण करण्याच्या उद्देशाने जागतिक पातळीवर शिक्षक दिवस साजरा करण्यात येतो. 5 आक्टोंबर 1966 रोजी पॅरिसमध्ये अंतर सरकारी सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यात “टीचिंग इन फ्रीडम” संधीवर हस्ताक्षर करण्यात आले.यानंतर 1994 ला युनेस्कोमध्ये एक सम्मेलन आयोजित करण्यात आले होते व यात 5 आक्टोंबर जागतिक शिक्षक दिवस साजरा करण्याची घोषणा करण्यात आली आणि तेव्हापासून 5 आक्टोंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय शिक्षक दिवस म्हणुन साजरा करण्यात येतो. जागतिक स्तरावर ही बाब सर्वांनाच समजायला पाहिजे की गुरू शिष्याचे काय नाते असते.शिक्षक हा असा चेहरा आहे की तो लाखो ते करोडो विद्यार्थी घडवीतात म्हणजेच जग व देश घडवितो.शिक्षणा विषयी अचूक माहीती देणे व प्रत्येक गोष्टीचे महत्व समजावून देणे संपूर्ण शिक्षकांचे प्रथम कर्तव्य असते. यामुळेच आपण घडतो नंतर देश घडते व याचा संपूर्ण प्रभाव जगावर पडतो.शिक्षक दिनाचा महत्त्वपूर्ण उद्देश म्हणजे शिक्षकांना सन्मान मिळणे व विद्यार्थ्यांना देश घडवीण्यासाठी प्रोत्साहीत करने.आपण जगात आधुनिकीकरण,यांत्रीकरण, औद्योगिकीकरण यांची वाटचाल जी पहात आहोत ती शिक्षकांपासुनच निर्माण झालेली उर्जाच म्हणावी लागेल. आपण पहाले की करोणा काळात ऑनलाइन शिक्षण प्रणाली सुरू होती.परंतु विद्यार्थीवर्ग ऑनलाईन शिक्षण प्रणालीला जवळ करायला तयार नव्हते.त्यामुळे शिक्षक व विद्यार्थी यांचे नाते ऑनलाईन राहुच शकत नाही.कारण करोना काळातील दोन वर्षांच्या काळात संपूर्ण जगातील विद्यार्थी शिक्षकांपासुन व शाळा-कॉलेजपासुन दुरावले होते त्यामुळे संपूर्ण शिक्षणाचा खोळंबा झाला व आज विद्यार्थांना त्यांचे प्रायश्चित्त भोगावे लागत आहे आणि ऑफलाईन(प्रत्यक्ष) शिक्षण जड होतांना दिसत आहे.ऑफलाईन शिक्षणामुळे जेवढी ज्ञाणामध्ये भर पडते,तेवढी ऑनलाईन(अप्रत्यक्ष)शिक्षण प्रणालीत पडत नाही हे आपल्याला कोरोनाने दाखवून दिले.यामुळे प्रत्यक्षात शिक्षणाने जवळीक वाढुन ज्ञाणात मोठी भर पडते.प्रत्येक देश आप-आपल्या पध्दतीने शिक्षक दिवस साजरा करीत असतो. यामध्ये भारतात माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्म दिवशी म्हणजे 5 सप्टेंबरला शिक्षक दिवस साजरा करण्यात येतो,चीन 27 ऑगस्ट,रूस 5 आक्टोंबर अशाप्रकारे जगातील अनेक देश आप-आपल्या पध्दतीने शिक्षक दिवस साजरा करतात.कारण यामुळे शिक्षक व विद्यार्थी यांचे अतूट संबंध निर्माण होवून गुरू-शिष्याचे नाते निर्माण होतात. यामुळे शिक्षणाचे आगळावेगळे महत्व दिसून येते.परंतु 5 आक्टोंबर आंतरराष्ट्रीय शिक्षक दिनाचे वेगळेच महत्व आहे कारण संपूर्ण जग एकाच दिवशी शिक्षकांच्या गुणवत्तेची पावती जगाला देत असते व उत्सहाचे वातावरण निर्माण करतो.यामुळे जगातील शिक्षकांचा मानसन्मान वाढतो व गुरू-शिष्याचे घनिष्ठ संबंध निर्माण होते.जगात गुरू-शिष्याचे नाते आजचेच नसुन पुरातन काळातील आहे.ऋषी-मुनि, देव-दानव,राजे-महाराजे, थोर पुरुष, क्रांतिकारक याची संपुर्ण वाटचाल शिक्षकांपासुनच निर्माण झाली आहे.आपण खेळांचा जरी विचार केला तर गुरू शिवाय खेळाडू सुध्दा तयार होत नाही.म्हणजेच कोणतेही शिक्षण असो या करीता शिक्षक अती आवश्यक असतोच म्हणून म्हणतात “गुरू बिना ज्ञान अधुरा” आई-वडीलांमध्ये सूध्दा आपल्याला मुलांच्या दृष्टीकोनातून गुरू-शिष्याचे अतुट नाते दिसून येते.तेव्हाच मुलं-मुली परीपक्व होतात.त्याकाळी शिक्षकांना गुरू म्हणायचे व विद्यार्थ्यांना शिष्य.आताही तेच आहे फक्त शब्द बदलून शिक्षक-विद्यार्थी असे नामकरण झाले आहे.म्हणजे पुर्वीही शिक्षकांविना ( गुरू) शिक्षण अधुरे रहायचे आणि आजही तेच आहे.त्यामुळे शिक्षक हा घटक जगासाठी व देशासाठी अत्यंत महत्त्वाचा आधारस्तंभ आहे.कारण यातुनच विद्यांर्थांचा उगम होतो व देश घडवीण्याचा मार्ग मोकळा होतो.शिक्षण हे विकत मिळत नसते तर ते अवगत करावे लागते.शिक्षण ही अशी संजीवनी आहे की त्याला कोणीही चोरू शकत नाही किंवा हीरावु शकत नाही. त्यामुळे शिक्षण शिकण्यासाठी कोणत्याही प्रकारची वयोमर्यादा नसते.परंतु शिक्षणाचा उज्ज्वल मार्ग निर्माण करण्यासाठी चांगल्या शिक्षकांची आवश्यकता जरूर असते. आंतराष्ट्रीय शिक्षक दिनाच्या निमित्ताने जगातील संपूर्ण शिक्षकांनी पृथ्वीवरील जीवसृष्टी वाचविण्यासाठी 5 आक्टोंबरला प्रत्येक शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करावा व यात संपूर्ण विद्यार्थांना(शिष्यांना) सहभागी करून भारतासह संपूर्ण जगात हिरवागार गालिचा निर्माण होईल यापध्दतीने जगातील संपूर्ण शिक्षकांनी पाऊले उचलावीत.यामुळे निसर्ग प्रफुल्लित रहाण्यास मोठी मदत होईल.कारण गुरू-शिष्याच्या पुढील वाटचाली करीता मन प्रसन्न असने गरजेचे आहे.कारण पुर्वी शिक्षण हे वृक्षांच्याच सानिध्यात दिले जात असे त्यामुळेच आज प्रत्येकांच्या आयुष्यासाठी गुरू -शिष्याप्रमाणेच वृक्षांशीही नाते घनिष्ठ करणे गरजेचे आहे.कारण ज्या प्रमाणे शिक्षकांविना ज्ञाण नाही त्याच प्रमाणे वृक्ष विना सृष्टी नाही म्हणजेच संपूर्ण जीवन अधुरेच.त्यामुळे प्रत्येक सणाला, महत्त्वपूर्ण दिवसाला वृक्षारोपण व्हायलाच पाहिजे.5 आक्टोंबरला जागतिक शिक्षक दिवसाचे औचित्य साधून मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड व्हायला हवी.आंतराष्ट्रीय शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
लेखक.
रमेश कृष्णराव लांजेवार
