Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादसोयगाव तालुक्यात सर्वसाधारण महिलांसाठी २३ जागा राखीव-सोडतीला गावनेत्यांची गर्दी : ४६ ग्रामपंचायतींचे...

सोयगाव तालुक्यात सर्वसाधारण महिलांसाठी २३ जागा राखीव-सोडतीला गावनेत्यांची गर्दी : ४६ ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण जाहीर

सोयगाव तालुक्यात सर्वसाधारण महिलांसाठी २३ जागा राखीव-सोडतीला गावनेत्यांची गर्दी : ४६ ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण जाहीर
आत्ताच एक्सप्रेस
सोयगाव/ प्रतिनिधी/ सोयगाव तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी दुपारी दीड वाजता सरपंच पदासाठी आरक्षण सोडत झाली. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण या प्रवर्गासाठी सरपंच आरक्षण काढण्यात आली. गोंदेगाव,सावळदबारा, या मोठ्या ग्रामपंचायतींसह २३ ग्रामपंचायती सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाल्याचे तहसीलदार मनिषा मेने यांनी जाहीर केले.
सोयगाव येथील पंचायत समितीच्या सदनमध्ये दुपारी १ वाजून तीस मिनिटांनी सोडतीला सुरुवात झाली. त्याला तालुक्यातील गाव नेत्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी तहसीलदार मनीषा मेने,  नायब तहसीलदार संभाजी देशमुख, गटविकास अधिकारी दादाराव अहिरे, सहायक गटविकास अधिकारी तात्याराव माळी, सहायक महसूल अधिकारी आकाश तुपारे,महसूल सहायक उज्ज्वला वामने, दीपक फुसे,सचिन ओहोळ, यांची उपस्थिती होती.
अनुसूचित जाती प्रवर्ग महिला निमखेडी,मोलखेडा
अनुसूचित जाती सर्वसाधारण; जरंडी, शिंदोल
 अनुसूचित जमाती प्रवर्ग महिला : घोसला, हनुमंत खेडा, वाकडी
अनुसूचित जमाती सर्वसाधारण;-घाणेगाव तांडा,उप्पलखेडा,जामठी
 नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला:पळाशी,रवळा,गोंदेगाव,कंकराळा,दस्तपूर, तितुर
नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण; सावरखेडा,जंगलातांडा,गलवाडा(सो),पिंपळवाडी,तिडका, कवली
 सर्वसाधारण महिला :पळसखेडा,जंगली कोठा, देव्हारी, सावळदबारा, वनगाव,नांदातांडा,टिटवी,वरठाण,आमखेडा, किन्ही,बनोटी, डाभा,
सर्वसाधारण खुला वर्ग;-फर्दापुर, वरखेडी( बु),माळेगाव, पहुरी (बु),वाडी सुतांडा,वरखेडी( खु),बहुलखेडा, नांदगाव तांडा,वडगाव (ति),मोहलाई,निंभोरा,निंबायती,.
दरम्यान निंबायती आणि तितुर ग्रामपंचायत च्या आरक्षण वर शमा तडवी, अली बाबा तडवी, सुनील माने आदींनी आक्षेप घेतला होता यावर अध्यासी अधिकारी तहसीलदार मनीषा मेने यांनी आक्षेप फेटाळून लावत समाधान केले
—आरक्षण साठी दोन तास गाव पुढारी तरंगून
दरम्यान ग्रामपंचायत आरक्षण साठी पहिल्या आदेशात सकाळी साडे अकराच्या वेळ देण्यात आली होती परंतु पुन्हा नव्याने आदेश निर्गमित करून वेळ दीड वाजता करण्यात आली होती परंतु सुधारित आदेश गाव पुढाऱ्यांपर्यंत पोहचला च नव्हता त्यामुळे साडे अकरा वाजेपासून पुढारी प्रतीक्षा करत होते मात्र महसूल आणि पंचायत समिती कर्मचारी दीड वाजता आले त्यामुळे दोन तास पुढारी तरंगून होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments