तुळजापूर 400 किमी सावळदबारा येथील युवकांनी पायी चालत ज्योत आणली
सर्व युवकाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोयगाव तालुका संघटक गुलाबराव पाटील कोलते यांच्याकडून स्वागत
सावळदबारा/प्रतिनिधी/ सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील युवकांनी तुळजापूर 400 किलोमीटर अंतरावरील सावळदबारा गावापर्यंत पायी चालत ज्योत आणली आहेत ज्योत घेऊन 22 सप्टेंबर रोजी सावळदबारा येथे आगमन झाले आहे. गावात ज्योत घेऊन आल्यानंतर ढोल ताशाच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले
या सर्वांचे युवकांचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोयगाव तालुका संघटक गुलाबराव पाटील कोलते याच्या वतीने स्वागत केले
तुळजापूर येथून पायी चालत ज्योत गावात आल्यानंतर घराघरासमोर रांगोळी काढण्यात आले होते
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोयगाव तालुका संघटक गुलाबराव पाटील कोलते,गणेश नरोटे,ज्ञानेश्वर वरखड,सागर कुल्ली, निवृत्ती खडके, जीवन कुल्ली,आदेश पाटील, दिपक गलबले, प्रतिक देशमुख, यश टिकारे,नामेदव जाधव,ज्ञानेश्वर सोनवणे,यश पाटील, मगेश टिकारे, चेतन इगळे,प्रकाश देशमुख,मयुर सपाटे,पंकज टिकारे. यश पधाडे,शंकर खराटे,संदिप कोलते, गोपाल सपाटे, पवन कुल्ली,विशाल खडके,तुकाराम खिरडकर तसेच आदी होते.