Tuesday, October 28, 2025
Homeऔरंगाबाद4 सप्टेंबरला पोलिस पाटील भरतीसाठी आरक्षण सोडत

4 सप्टेंबरला पोलिस पाटील भरतीसाठी आरक्षण सोडत

4 सप्टेंबरला पोलिस पाटील

भरतीसाठी आरक्षण सोडत

 

जालना :- जालना उपविभागातील समाविष्ट असणाऱ्या जालना व बदनापूर तालुक्यातील एकुण 185 गावांतील पोलिस पाटील रिक्त पदाची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तरी पोलिस पाटील रिक्त पदाची भरती प्रक्रियेसाठी गावनिहाय, जात प्रवर्गनिहाय, रिक्त पदाच्या तीस टक्के महिला आरक्षण सोडत गुरुवार दि.4 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात काढण्यात येणार आहे. पोलिस पाटील सरळसेवा एकुण मंजूर पदे 226 असून 41 पदे भरलेली आहेत तर 185 पदे रिक्त आहेत. ज्या नागरिकांना आरक्षणावर आक्षेप, हरकत असेल त्यांनी लेखी स्वरुपात आपले आक्षेप उपविभागीय अधिकारी, जालना येथे समक्ष उपस्थित राहून  दि.8 ते 10 सप्टेंबर 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन जालना उपविभागीय अधिकारी रामदास दौंड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments