4 लाख 15 हजारांची वीजचोरी; 47 जणांवर गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर : महावितरणच्या धडक मोहिमेत तीसगावातील खवडा डोंगर परिसरात अनेक ठिकाणी लघुदाब विद्युत वाहिनीवर आकडे टाकून वीजचोरी केल्याचे प्रकार उघड झाले. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात 47 जणांवर मंगळवारी रात्री (6 मे) गुन्हे दाखल करण्यात आले.
16 ऑक्टोबर 2024 रोजी महावितरणच्या वाळूज महानगर शाखेचे सहायक अभियंता गोविंद दुसंगे, प्रधान तंत्रज्ञ प्रेमसिंग डोभाळ, वरिष्ठ तंत्रज्ञ सचिन देवरे, तंत्रज्ञ नानासाहेब गायकवाड, विद्युत सहायक योगेश गाडेकर यांनी तीसगावातील खवडा डोंगर परिसरात वीज जोडणी तपासणी व वीजचोरी पकडण्यासाठी मोहीम राबवली. त्यात काही नागरिक लघुदाब वाहिनीवर आकडे टाकून वीज वापर करताना आढळून आले.
वीजचोरी करणाऱ्यांमध्ये युवराज उत्तम लोखंडे, अशोक गंगाधर साळवे, दशरथ बालाजी साबळे, अनिल साहेबराव म्हस्के, भगतसिंग प्रतापसिंग सोनावणे, रामसिंग धरमराज बिंद, मनोहर रामभाऊ भोपळे, कैलास रघुनाथ शेलार, वैजनाथ बाबुराव चौगुले, सुभाष विठ्ठल खुळे, सोनाजी गुणाजी रोडगे, राजू मोहन धोत्रे, सुनीता रामदास गवई, गुलाब किसान आगळे, उमेश केशव जाधव वापरकर्ता (घरमालक मिलिंद दाभाडे), ज्ञानेश्वर फत्तू राठोड, संतोष फत्तू राठोड, बाबू लक्ष्मण मगरे, गणेश महादू मोहिते, रमेश राधेशाम राठोड, भास्कर नाना पवार, नितीन सुभाष आल्हाट, गोरक्षनाथ माधव जाधव वापरकर्ता (घरमालक हिरामण मधु दणके), दीपक प्रभू माळी वापरकर्ता (घरमालक हिरामण मधु दणके), संतोष मधुकर रोडगे, विजय साहेबराव मंजुळकर, प्रतीक दादाराव जाधव, आनंद बबन गुंजाळ, रामदास भिका आहेर, किशोर हरिभाऊ नाडे, मधुकर गोविंद हिवराळे, रमेश नारायण वाडेकर, भानुदास सूर्यकांत सरोदे,
विलास तुकाराम जाधव, दिनेश साहेबराव दळवे, दत्तू नागू इटकर, सलेंद बबन धोत्रे, सतीश बन्सी बोराडे, लखन गुलाबराव गायकवाड, सांडू उत्तम विटकर, संजय सोनाजी रगडे, संतोष सोनाजी रगडे यांचा समावेश आहे. या सर्वांनी मिळून 4 लाख 15 हजार 269 रुपयांची 20 हजार 784 युनिट वीजचोरी केली.
महावितरणने या सर्वांना वीजचोरीची निर्धारित बिले दिली तसेच सर्वांना प्रत्येकी 2 हजार रुपयांचे तडजोड शुल्क रक्कमही आकारण्यात आले. मात्र ती भरण्यास आरोपींनी टाळाटाळ केली. अखेर सहायक अभियंता गोविंद दुसंगे यांच्या फिर्यादीवरून छावणी पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री 47 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
