जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी १०० उमेदवारांची माघार , ४ गटात १४ तर ८ गणात ३० जण रिंगणात
फुलंब्री/प्रतिनिधी/ फुलंब्री तालुक्यात अखेरच्या दिवशी एकूण १०० उमेदवारांनी जि.प., पं.स.निवडणूक रिंगणातून माघार घेतली. आता निवडणूक चित्र स्पष्ट झाले आहे. चार जिल्हा परिषद गटांत १४ उमेदवार तर आठ पंचायत समिती गणांत ३० उमेदवार निवडणूक मैदानात आहेत. बाबरा, वडोदबाजार येथे तिरंगी तर पाल, गणोरीत चौरंगी लढत होत आहे.दिनांक २७ जानेवारी २०२६
मंगळवार रोजी अर्ज माघे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चार जिल्हा परिषद गटातील
बाबरा, वडोद बाजार तिरंगी तर पाल, गणोरीत चौरंगी लढत
उमेदवारांनी तसेच आठ पंचायत समिती गणांतून ७२ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. दोन्ही ठिकाणी एकूण छाननीनंतर १४४ उमेदवारी अर्ज वैध होतेः त्यातील १०० उमेदवारांनी माघार घेतल्याने चार गटांत १४ तर आठ गणांत ३० उमेदवार उभे आहेत. बाबरा, वडोदबाजार मधून तिरंगी तर पाल, गणोरीत चौंरगी लढत होणार आहे. अनेकांची समजुत काढुन उमेदवारी मागे घेण्यासाठी दिवसभर राजकीय पुढाऱ्यांनी दमछाक दिसून आली.
अशी माहिती निवडणुक अधिकारी यांनी दिली.
