फुलंब्रीत ४ ते ११ फेब्रुवारी दरम्यान होणार सप्ताह व पंचकुंडात्मक यज्ञ
शहरवासीय व भक्तांच्या बैठकीत केले कार्यक्रमाचे नियोजन
फुलंब्री/प्रतिनिधी/ येथे ४ ते ११ फेब्रुवारी या दरम्यान सप्ताह व पंचकुंडात्मक यज्ञ होत आहे. यासाठी (दि. ०५) शहरवासिय व भक्तांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्व नियोजन करण्यात आले आहे. दर पाच वर्षाला येथे पंचकुंडात्मक यज्ञ होतो हा यज्ञ गेल्या ३५ वर्षांपासून होत आहे. या सातव्या यज्ञाचे आज नियोजन करण्यात आले येथील अँड. त्रिबकराव शिरसाठ हे ३५ वर्षांपासून ह्या यज्ञाची जबाबदारी सांभाळत आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज पर्यंतचे यज्ञ सोहळे पार पडले आहे. आजच्या बैठकीत शहरातील जेष्ठ व युवक याची संख्या मोठ्या प्रमाणात होती. बस्थानाकाच्या सम ोरील यज्ञ भूमीच्या प्रांगणात हा यज्ञ सोहळा होत आहे. या यज्ञासाठी जमीन दाराने या वर्षीचे कोणतेही पिक घेतले नाही जवळपास पाच ते सहा एकर मध्ये हा यज्ञ सोहळा पार पडतो. बैठकीत सात दिवसाच्या कीर्तन सेवेची व्यवस्था झाली. यात प्रत्येक दिवसाच्या कीर्तनाची जबाबदारी एक एका वेक्तीतेने घेतली आहे. सात दिवस दररोज भोजन व्यवस्था हि देखील आजुबाजुच्या गावकऱ्यांनी सांभाळली आहे. शेवटच्या दिवशी यज्ञ आहोती होऊन काल्याचे कीर्तन होणार आहे. या समारोप प्रसंगी दहा हजार लोकांना पुरण पोळीचा महाप्रसाद दिला जाणार आहे. यावेळी शहरातील महिलांना आवाहन केले जाईल त्यानुसार प्रत्येक महिला ही आपल्या घरून पुरण पोळ्या घेऊन यज्ञ स्थळी येतील. दि. २५ जानेवारी रोजी ध्वज स्तंभ उभारून यज्ञ पर्वास सुरूवात होणार आहे. या सात दिवसात रोज सकाळी योगासने, ज्ञानेश्वर पाठ, किर्तन, व्याख्याने होणार आसुन यातील एक दिवस सामुहिक विवाह साठी दिला आहे. या विवाहचा खर्च यज्ञ समिती करणार आहे. ज्या युवक युवतीनी विशेष प्रावीण्य मिळविले आशाचा सन्मान या सप्ताहात होणार आहे. हे सात दिवस शहरातील प्रमुख मार्गावरूण दिंडी रूपात प्राभात फेरी निघणार आहे यज्ञ स्थळी चोवीस तास मृदूंगाचा खडा पहारा दिला जाणार आहे. आजच्या बैठकीत यज्ञा साठी लागणारे साहित्य व आथिर्क देणगी देण्यासाठी मोठा उत्साह दाखवून आप आपले आथिक आकडे भक्तानी दिले यामुळे या यज्ञ खर्चाचे मोठे ओझे आज कमी झाले आहे. सुशांत महाराज पवार यांनी सात दिवसाच्या नामांकित कीर्तनकारांची व्यवस्था करून त्यांच्या तारखा ठरवल्या आहेत. या बैठकीस अँड त्रिबक शिरसाठ, राघोजी ढंगारे, देवराव राऊत, गंगाधर मुळे, पवन घोडके, माजी नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, याची उपस्थित होती तसेच मदन जोशी यांनी यज्ञातील सर्व बृह्मवृंदाची जबाबदारी घेतली आहे. आशा ह्या यज्ञ सोहळ्यास सर्वांनी सर्वतोपरी मदत करावी असे आवाहन यज्ञ समितीने केले आहे. ह.भ.प. सुशांत महाराज पवार यांनी सात दिवसाच्या नामांकित कीर्तनकारांची व्यवस्था करून त्यांच्या तारखा ठरवल्या आहेत. या बैठकीस अँड त्रिबक शिरसाठ, राघोजी ढंगारे, देवराव राऊत, गंगाधर मुळे, पवन घोडके, माजी नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, याची उपस्थित होती तसेच मदन जोशी यांनी यज्ञातील सर्व बृह्मवृंदाची जबाबदारी घेतली आहे. आशा ह्या यज्ञ सोहळ्यास सर्वांनी सर्वतोपरी मदत करावी असे आवाहन यज्ञ समितीने केले आहे.