31 फुटी पाषाण पोहोचणार संभाजीनगरात
भरत – बाहुबली या दोन भावांचे एकताचे प्रतिक
नाशिक :- नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात प.पू. आचार्य श्री देवनन्दिजी गुरुदेव यांच्या संकल्पनेतुन असेलेले णमोकार तीर्थ आकार घेत आहे. 6 ते 13 फेब्रुवारी 2026 रोजी णमोकार तीर्थाचे भव्य आंतराष्ट्रीय पंचकल्याणक प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक महोत्सव होणार आहे. त्यानिमित्त जोरदार तैय्यारी सुरु आहे.
या तीर्थावर भगवान आदिनाथ भगवान भरत व भगवान बाहुबली यांची भव्य 31 फूंटउंच प्रतिमा उभी केली जाणार आहे. त्यापैकी भगवान आदिनाथ यांची प्रतिमा उभी झालेली आहे. भगवान बाहुबली व भगवान भरत यांच्या प्रतिमेसाठी 31 फुट उंच 2 पाषाण बैंगलुरु येथील खाणीतुन ट्रकने येत आहे. हा पाषाण बैंगलुरु येथुन 1 एप्रिल ला निघुन तुमकुर, चित्रदुर्ग, होसपेठ, बागलकोट, बिजापुर येथुन प्रवास करीत काल 16 एप्रिल रोजी महाराष्ट्राच्या भूमीत सोलापुर येथे यांचे भव्य स्वागत करण्यात आले. तेथुन उस्मानाबाद, बीड, मार्गे संभाजीनगर येथे 19 एप्रिल रोजी पोहोचणार आहे. बीड बायपास जवळ संभाजीनगरातील सर्वधर्मांयांतर्फे भव्य स्वागत व पूजन केले जाणार आहै.
या पाषाणाचे विशेष म्हणजे हे पाषाण काही दिवसात णमोकार तीर्थ येथे भरत व बाहुबली चे रुप घेणार आहे. भगवान आदिनाथांचे पूत्र भरत हे चक्रवर्ती होते, 4 खंडाचे राजा होता. त्यांच्या नावावरुनच आपल्या देशाला भारत नाव पडले आहे. तसेच भगवान बाहुबली हे वीर पराक्रमी होते. त्यांची श्रवणबेलगोला येथे जगप्रसिध्द 52 फुट प्रतिमा आहे. त्यानंतर ही दोघांची सर्वात मोठी प्रतिमा ठरणार आहे. अशा माहिती णमोकार तीर्थाचे अध्यक्ष निलम अजमेरा यांनी दिली.
फेब्रुवारी 2026 मध्ये होणार्या या जागतिक महोत्सवामध्ये लाखोंच्या संख्येने भाविक येणार आहे. नाशिक येथे होणार्या कुंभमेळा अगोदर जैन समाजाचा हा महाकुंभ होणार आहे असे म्हटले जात आहे अशी माहिती महोत्सवाचे अध्यक्ष संतोषजी पेंढारी यांनी दिली.
19 एप्रिल रोजी संभाजी नगर हुन वैजापुर, येवला, मनमाड, मालेगांव मार्ग दोन्ही पाषाण अंदाजे 21 एप्रिल रोजी णमोकार तीर्थ येथे पोहोचणार आहे अशी माहिती महोत्सवाचे प्रचार प्रमुख पारस लोहाडे यांनी दिली।
ही प्रतिमा दोन सख्याभावांची आहे. हे एकतेचे प्रतिक आहे म्हणुन संभाजी नगरातील 108 भाऊ एकत्र येवुन या पाषाणाचे पूजन करतील, शहरातील सर्वपक्षीय नेते, जैन समाजातील गणमान्य व्यक्ति, पुरुष-महिला मोठ्या संख्येने बीड बायपास, संभाजी नगर येथे उपस्थित राहणार आहे, अशी माहिती णमोकार तीर्थाचे विश्वस्त ललित पाटणी रवि पहाड़े देवेन्द्र काला जितेंद्र पहाड़े प्रकाश ठोले विनोद लोहाडे विपीन कासलीवाल महेंद्र ठोले मनोज दगडा यांनी दिली अशी माहिती प्रचार प्रसार संयोजक नरेंद्र अजमेरा पियुष कासलीवाल औरंगाबाद यानी दिली आहे