राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत
मानधन सन्मान योजना; ३१ जुलै पर्यंत अर्ज मागविले
छत्रपती संभाजीनगर – शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत यांना मानधन सन्मान योजना राबविण्यात येते. ज्या साहित्यिक कलावंतांना प्रती महिना पाच हजार रुपये मानधन देण्यात येते.
पात्रतेचे निकषः-
वय ५० वर्षांपेक्षा जास्त, दिव्यांगांना वयाची अट १० वर्षांनी शिथिल (दिव्यांगांना वयोमर्यादा ४० वर्ष), कला व साहित्य क्षेत्रातील योगदान कमीत कमी १५वर्ष, साहित्य व कलाक्षेत्रात सातत्यूपर्ण, दर्जेदार व मोलाची भर, वयाने ज्येष्ठ असणारे, विधवा, परितक्त्या/दिव्यांग कलाकार यांना प्राधान्य, कलाकाराचे सर्व मार्गांनी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ६० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे. ज्या कलाकारांची उपजीविका फक्त कलेवरच अवलंबून आहे असे कलाकार तसेच जे कलाकार फक्त कलेवरच अवलंबून होते, मात्र सध्या त्यांना इतर कोणत्याही मार्गाने उत्पन्न नाही असे कलाकार, केंद्र किंवा राज्य शासनाच्या महामंडळे इतर कोणत्याही नियमित पेन्श्न योजनेत अंतर्भूत नसलेले पात्र कलाकार. कलाकार, साहित्यिक महाराष्ट्राचा राहिवासी असणे बंधनकारक .
अर्जा सोबत जोडावयाची कागदपत्रेः-
वयाचा दाखला, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, प्रतिज्ञापत्र, पति व पत्नीचा एकत्रित फोटो (लागु असल्यास), बँक तपशील- बँक खाते क्रमांक व बँकेचा IFSC कोड क्रमांक, अंपगत्व दाखला (लागू असल्यास), राज्य, केंद्र सरकार पुरस्कार प्रमाणपत्र (लागू असल्यास) नामांकित संस्था, व्यक्ती शिफारस पत्र लागू असल्यास,विविध पुरावे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र साहित्यिक, कलावंतांनी महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार पोर्टलवर दि.१ जुलै ते ३१ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिाकरी (ग्रामपंचायत) तथा सदस्य सचिव राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना समिती जिल्हा परिषद यांनी केले आहे.
