“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ३०० वी जयंतीनिमित्त जुना जालना येथे भव्य धार्मिक कार्यक्रम – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन”
जालना/प्रतिनिधी/ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी जालना महानगरच्या वतीने आज जुना जालना मंडळ येथील जागृतेश्वर महादेव मंदिर, पलंग बावडी, इंदिरानगर परिसरात विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मंदिर, घाट व मठ परिसर स्वच्छता मोहिमेने करण्यात आली. त्यानंतर पारंपरिक शंखनाद आणि मंत्रोच्चारासह भव्य महाआरती करण्यात आली. वेदपठनाने परिसर आध्यात्मिकतेने भारून गेला. उपस्थित भक्तांनी भक्तीगीतांमधून अहिल्यादेवींच्या कार्याची आठवण केली.
भाजपा जालना महानगरचे जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यावर आधारित माहितीपूर्ण पत्रकांचे नागरिकांना वाटप केले. या पत्रकांमध्ये अहिल्यादेवींच्या दूरदृष्टीपूर्ण प्रशासन, समाजहिताची बांधिलकी, मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी घेतलेले प्रयत्न, स्त्री शिक्षण व सशक्तीकरणासाठी दिलेले योगदान यांचे सविस्तर वर्णन करण्यात आले होते. भास्कर आबा दानवे यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला आणि अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनचरित्र केवळ इतिहासापुरते मर्यादित न ठेवता, आजच्या समाजातही त्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. या उपक्रमाच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांमध्ये अहिल्यादेवींच्या आदर्श नेतृत्व, निःस्वार्थ सेवा आणि भारतीय संस्कृतीतील योगदानाविषयी जागृती निर्माण करण्याचा मोलाचा प्रयत्न करण्यात आला. विशेषतः युवा पिढीला त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेता यावी, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू होता. या कार्यक्रमास जालना महानगर जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच महिला पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदविला. यामध्ये स्थानिक नागरिकांचाही उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
कार्यक्रम प्रसंगी बद्रिनाथ पठाडे, अशोक अण्णा पांगारकर, सोपान पेंढारकर, कपिल दहेकर, प्रा.राजेंद्र भोसले, महेश निकम, सुनिल खरे, अर्जुन गेही, सिद्धिविनायक मुळे, सुनिल पवार, संध्याताई देठे, शुभांगीताई देशपांडे, मनीषा भोसले, विद्याताई कुलकर्णी, सुनंदा बदनापूर, वैशाली बनसोडे, वंदना ढगे, सारिका पाटील, राजेश जोशी, सतीशचंद्र प्रभू, सुमित सुरडकर, सुहास मुंडे, डोंगरसिंग साबळे, मनोज इंगळे, सोमेश काबलिये, रमेश गोगडे, शाम उगले, सतीश अकोलकर, तसेच इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
