उपाध्याय विरंजनसागरजी महाराज ससंघाचे चातुर्मासासाठी २८ जुन रोजी आगमन
छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी/ प.पु.आचार्य समाधीसम्राट विरागसारजी महाराज यांचे प्रभावक शिष्य प.पु.पटटाचार्य विशुध्दसागरजी महाराज यांचे आज्ञानुवर्ती शिष्य प.पु.उपाध्याय १०८ विरंजनसागरजी महाराज, मुनिश्री विनीशोधसागरजी महाराज, मुनिश्री विसौम्यसागरजी महाराज, प.पु.क्षुल्लिका विशिलाश्री माताजी यांचा ससंघाचा चातुर्मास श्री.१००८ मल्लीनाथ दिगंबर जैन मंदिर देशमुखनगर,शिवाजीनगर येथे होणार आहे. उपाध्याय विरंजनसागरजी महाराज ससंघाचे दिनांक २८ जुन रोजी सकाळी ७ वाजता राष्ट्रसंत तरâणसागरजी महाराज चौक सेव्हनहिल जालना रोड येथे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी सकल जैन समाजातील समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित राहणार आहे. यावेळी महिलांनी केशरी रंगाच्या साडया परिधान कराव्यात तसेच पुरâषांनी पांढरे वस्त्र परिधान कराव्यात, महिलांनी डोक्यावर मंगल कलश घेवुन मुनिश्रीच्या पुढे चालावे. उपाध्याय संघाचे सेव्हन हिल, गारखेडा मार्गे देशमुखनगर जैन मंदिरात आगमन होईल. यावेळी उपाध्याय यांच्या सानिध्यात भगवंताचा अभिषेक प्रवचन व आहारचर्या संपन्न होईल. तरी सकल जैन समाजाच्या बांधवांनी वरील कार्यकमास मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्श्वनाथ मंदिर राजाबजार अंतर्गत श्री.१००८ भगवान मल्लीनाथ दिगंबर जैन मंदिर व सकल दिगंबर जैन समाज यांनी केले आहे.