Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादराजाबजार जैन मंदिरात पर्युषण पर्व निमीत्त्त २८ ऑगस्ट ते ०६ सप्टेबर पर्यत...

राजाबजार जैन मंदिरात पर्युषण पर्व निमीत्त्त २८ ऑगस्ट ते ०६ सप्टेबर पर्यत भरगच्च धार्मिक कार्यकमांचे आयोजन आचार्य डॉ.प्रणामसागरजी महाराज यांच्या सानिध्यात पर्युषण महापर्व साजरा करण्यात येणार 

राजाबजार जैन मंदिरात पर्युषण पर्व निमीत्त्त २८ ऑगस्ट ते ०६ सप्टेबर पर्यत भरगच्च धार्मिक कार्यकमांचे आयोजन आचार्य डॉ.प्रणामसागरजी महाराज यांच्या सानिध्यात पर्युषण महापर्व साजरा करण्यात येणार 
छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी/  श्री १००८ खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्श्वनाथ मंदिर राजबजार येथे दहा दिवसीय पर्युषण महापर्व २८ ऑगस्ट ते ०६ सप्टेंबर पर्यत मोठया भक्ती भावाने साजरा करण्यात येणार असल्याचे पंचायत अध्यक्ष महावीर पाटणी व सचिव प्रकाश अजमेरा यांनी एका पत्रकाव्दारे दिली आहे. यावेळी आचार्य डॉ.प्रणामसागरजी महाराज भक्तांबरवाले बाबा यांच्या सानिध्यात  पर्युषण महापर्व साजरा करण्यात येणार आहे. सर्व प्रथम सकाळी २८ ऑगस्ट रोजी पंचायत अध्यक्ष महावीर पाटणी यांच्या हस्ते धर्म ध्वजारोहन होउâन दहा दिवसीय पर्युषण महापर्व सुरâवात होणार आहे. यामध्ये उत्त्तम क्षमा, मार्दव, आर्जव, शौच, सत्य, संयम, तप, त्याग, अकिचन्य, ब्रम्हचर्य या दहा धर्मावर आचार्यश्रींचे विशेष उदबोधन होणार आहे तसेच संपुर्ण कार्यकम अनुष्ठाचार्य कपिल पाटणी यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. दररोज पर्युषण पर्व निमीत्त्त सकाळी ५ वाजता ध्यान साधना, संगीतमय प्रभु आराधना, संगीतमय पंचामृत अभिषेक, संगीतय पुजन व दसलक्षण विधान सकाळी ७ वाजता, दहा धर्मावर दरोज सकाळी ९ वाजता विशेष प्रवचन, सकाळी आचार्र्यश्रीच्या सानिध्यात ९.४५ वाजता शांतीधारा, सकाळी १०.३० वाजता आहारचर्या, दुपारी २ वाजता तत्वार्थ सुत्राचे वाचन, दुपारी ४.३० वाजता श्रावक प्रतिव्रâमण व शंका समाधान, संध्याकाळी ७ वाजता सामाईक, ७.३० वाजता संगीतमय आरती व स्वाध्याय, ८.३० सांस्कृतिक कार्यकम होणार आहेत. तसेच २८ ऑगस्ट पासुन ध्यान शिबीर होणार असुन नमोकार से शारीरिक व मानसिक शुध्दी, २९ ऑगस्ट रोजी आत्मजागरण ओम ध्यान, ३० ऑगस्ट रोजी सम्मेदशिखरजी भाव ध्यान यात्रा, ३१ ऑगस्ट रोजी बुध्दी विकास ओम -िहम नमो ध्यान, १ सप्टेबर रोजी सोहम दिव्य शक्ती, २ सप्टेंबर रोजी भक्तांबर बिज मंत्र ध्यान, ३ सप्टेबर रोजी मृत्य बोध ध्यान, ४ सप्टेंबर रोजी अरिहंतगुण शक्ती ध्यान, ५ सप्टेबर रोजी भक्तांबर काव्य ध्यान, ६ सप्टेबर रोजी दसलक्षण से वार्षिक विशुध्दी तसेच सुपार्श्श्वनाथ भगवंताचा गर्भकल्याणक महोत्सव, भगवान पुष्पदंत भगवान निर्वाण लाडु महोत्सव, भगवान वासु पुज्य मोक्ष कल्याणक महोत्सव आदी धार्मिक कार्यकमांचे आयोजन करण्यात आले आहे. संपुर्ण कार्यकम हा राजाबजार जैन मंदिर व हिराकाका प्रागण आचार्य गुप्तीनंदी गुरâदेव सभागृहात होणार आहे. तरी समाज बाध्ांवांनी वरील कार्यकमास मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पंचायत अध्यक्ष महावीर पाटणी, सचिव प्रकाश अमजेरा, चातुर्मास समिती अध्यक्ष अ‍ॅड.अनिल कासलीवाल, महावीर ठोले, ललीत पाटणी, यतीन ठोले, अरâण पाटणी, संतोष सेठी, किरण पहाडे, जितेंद्र पाटणी, निता ठोले, चंदा कासलीवाल यांच्यासह      महामत्रि प्रमोदपाडे रवी सेठी दिनेश ठोले अशोक गगवाल सजय पहाडे आशीश सेठी सपना पापडीवाल चातुर्मास समिती ने केले असल्याची माहिती  प्रचार प्रसार संयोजक नरेंद्र अजमेरा व पियुष कासलीवाल यांनी दिली.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments