Tuesday, March 31, 2026
Homeऔरंगाबादवीजबिल दुरुस्ती मेळाव्यांत 245 तक्रारींचे जागेवर ‍निराकरण

वीजबिल दुरुस्ती मेळाव्यांत 245 तक्रारींचे जागेवर ‍निराकरण

वीजबिल दुरुस्ती मेळाव्यांत 245 तक्रारींचे जागेवर ‍निराकरण

छत्रपती संभाजीनगर :– संभाजीनगर परिमंडलातील  वीजग्राहकांसाठी सर्व उपविभाग कार्यालयांत आयोजित वीजबिल दुरुस्ती मेळाव्यांत सोमवारी (5 जानेवारी) प्राप्त 313 पैकी 245 ग्राहकांच्या तक्रारींचे जागेवरच निराकरण करण्यात आले. यापैकी 105 ग्राहकांनी लगेच 5 लाख रुपयांची वीजबिले भरून प्रतिसाद दिला. उर्वरित तक्रारी येत्या आठ दिवसांत करण्यात येणार आहेत.

       वीजबिलांबाबत येणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी सर्व उपविभागांत ग्राहकांचे मेळावे घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सर्व क्षेत्रीय अभियंते व लेखा कर्मचाऱ्यांनी मेळावे यशस्वी केले.

       छत्रपती संभाजीनगर शहर मंडलातील पॉवर हाऊस, छावणी, वाळूज शहर, शहागंज, क्रांती चौक, सिडको, गारखेडा व चिकलठाणा उपविभागांत 145 तक्रारी आल्या. त्यापैकी 132 तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडलातील ग्रामीण-1, ग्रामीण-2, पैठण, ‍बिडकीन, फुलंब्री, गंगापूर, वाळूज ग्रामीण, खुलताबाद, वैजापूर-1, वैजापूर-2, कन्नड,‍ पिशोर, ‍ सिल्लोड-1, सिल्लोड-2 व सोयगाव उपविभाग कार्यालयात 102 तक्रारी दाखल झाल्या. त्यापैकी 65 ग्राहकांच्या तक्रारींचे जागेवरच निराकरण करण्यात आले. जालना जिल्ह्यातील जालना शहर, जालना ग्रामीण, भोकरदन, जाफ्राबाद, बदनापूर, अंबड, घनसावंगी, परतूर व मंठा उपविभाग कार्यालयात प्राप्त झालेल्या 66 तक्रारींपैकी 48 तक्रारींचे जागेवरच निराकरण करण्यात आले. उर्वरित सर्व तक्रारी 8 दिवसांत निकाली काढण्यात  येणार आहेत.

        विशेष म्हणजे मेळाव्यांत तक्रारींचे निराकरण झाल्यामुळे शहरातील 70, ग्रामीणमधील 12 व जालना मंडलातील 23 ग्राहकांनी लगेच वीजबिले भरून सहकार्य केले. महावितरणच्या या उपक्रमाबद्दल ग्राहकांनी समाधान व्यक्त केले.

      मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी बिलांच्या तक्रारींबाबत योग्य ती कार्यवाही करण्याबाबत कर्मचाऱ्यांना निर्देश दिले. ग्राहकांचे अचूक मोबाईल नंबर नोंदवावेत, मीटर रीडिंगचे फोटो स्पष्ट असावेत तसेच दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी प्रत्येक उपविभागीय कार्यालयात हे मेळावे घ्यावेत, असे निर्देश मुख्‍य अभियंता कछोट यांनी दिले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments