Tuesday, March 31, 2026
Homeऔरंगाबादनांदेडमध्ये 24-25 जानेवारीला गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा 350 वा शहिदी समागम

नांदेडमध्ये 24-25 जानेवारीला गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा 350 वा शहिदी समागम

नांदेडमध्ये 24-25 जानेवारीला गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा 350 वा शहिदी समागम

नांदेड : हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागमानिमित्त नांदेड येथे 24 व 25 जानेवारी 2026 रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने भारतीय संत परंपरेतील धर्म, मानवता व बलिदानाचा संगम अधोरेखित करण्यात येणार आहे.
शीख धर्माचे नववे गुरू श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांनी धर्मस्वातंत्र्य व मानवाधिकारांसाठी सर्वोच्च बलिदान दिले, तर वारकरी संप्रदायातील संत नामदेव महाराजांनी भक्ती, समता व सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला. विशेष म्हणजे संत नामदेवांचे अभंग गुरुग्रंथ साहिबमध्ये समाविष्ट आहेत.
या समागमाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा, धार्मिक सहिष्णुता व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments