Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादमुकुंदवाडी ते चिकलठाणा 229 अतिक्रमण निष्कासित

मुकुंदवाडी ते चिकलठाणा 229 अतिक्रमण निष्कासित

मुकुंदवाडी ते चिकलठाणा 229 अतिक्रमण निष्कासित
मनपा/  मुकुंदवाडी ते चिकलठाणा रोडवर आज रोजी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकातर्फे एका मोठी कारवाईत एकूण पक्के कच्चे 229 अतिक्रमण काढण्यात आले.छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत आणि नियंत्रण अधिकारी अतिक्रमण विभाग संतोष वाहुळे, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी,सहायक पोलीस आयुक्त रणजीत पाटील यांच्या उपस्थितीत मुकुंदवाडी ते चिखलठाणा दरम्यान केलेल्या कारवाईत एकूण २२९ पक्की आणि कच्ची बांधकामे ज्यामध्ये दुकाने,शेड,कंपाऊंड,ओटे,गॅरेज,वॅाशिंग सेंटर,कमान,जाहिरात फलक,इ. निष्कासित करण्यात आले.
सदर कारवाई मध्ये महानगरपालिकेच्या १५० अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तर पोलीस विभागाचे १०० अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
या कारवाईसाठी १० जेसीबी,८ टिप्पर, २ रूग्णवाहिका, २ कोंडवाडा वाहने,इ. वाहनांचा समावेश होता.
सदरील कारवाई मध्ये सहाय्यक आयुक्त अर्जून गिराम,प्राजक्ता वंजारी, इमारत निरीक्षक कुणाल भोसले,शिवम घोडके,सागर श्रेष्ठ, तृप्ती जाधव,नगररचना विभागाचे सौरभ साळवे, सूरज यमवार नागरी मित्र पथकाचे प्रमोद जाधव व इतर कर्मचारी उपस्थित होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments