विभागीय आयुक्त कार्यालय समोर २० जूनला आत्मदहन करणारच… बाळासाहेब थोरात
दैनिक आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी/ गंगापूर व वैजापूर तालुक्यातील अनेक गावातील जिल्हा परिषद विभागाच्या विविध चालू असलेल्या बांधकामात कोट्यावधींचा घोटाळा झाला असून कुठलेही बांधकाम नं करता अंदाजपत्रकाच्या ८० टक्के रक्कम ठेकेदाराला अदा केली असून संबंधित दोषी असणाऱ्या बांधकाम एजेंसी काळ्या यादीत टाकून जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता सुखदेव काकड, कनिष्ठ अभियंता साहेबराव पाटील यांचीं विभागीय चौकशी करून तात्काळ निलंबीत करावे यासाठी २० जूनला विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे आत्मदहन करण्याचा इशारा अँटी करप्शन कमिटीचे बाळासाहेब थोरात यांनी दिला होता आत्तापर्यंत संबंधित अधिकारी यांच्यावर कुठलीही कारवाई न झाल्याने २० जूनला आत्मदहन करणारच असा गर्भित इशारा बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे. दरम्यान गंगापूर तालुक्यातील शंकरपूर, गुरुधानोरा,लासुर स्टेशन येथील जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य उपकेंद्र शाळेसह विविध बांधकामात आर्थिक घोटाळा झाला असून ठेकेदारांना कामे पूर्ण होण्याआधीच एकूण रक्कमेच्या ७० ते ८० टक्के कोट्यावधी रुपयांची बिले ठेकेदारांना अदा करून ठेकेदारांच्या घश्यात करोडो रुपये काम न होता घातले आहेत त्यामुळे आम्ही दि. ३० मे रोजी भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्यावतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयाला टाळे ठोको आंदोलनाचे निवेदन २८ मे रोजी देण्यात आले होते व दि , ३० मे रोजी टाळे ठोकण्यात येणार होते मात्र जिल्हा परिषदचे कनिष्ठ अभियंता साहेबराव पाटील यांनी लासुर स्टेशन येथे भेट दिली व त्यांनी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अभियंता सुखदेव काकड यांचे लेखी पत्र देऊन विविध बांधकामाच्या कामाची चौकशी समीती गठीत करण्यात आली असून येणाऱ्या काही दिवसात याची पूर्ण चौकशी होऊन लेखी अहवाल देणार असल्याचाही मुख्य कार्यकारी अभियंता यांनी दिलेल्या लेखी पत्रात म्हटले होते त्यामुळे टाळे ठोको आंदोलन तात्पुरते रद्द करण्यात आले होते मात्र आत्तापर्यंत कुठलीही चौकशी दोषी एजेंसीची झाली नाही की दोषी अधिकाऱ्यांवर काहीही कारवाई झाली नाही याबाबत अधिक चौकशी केली असता ठेकेदाराना जी देयके अदा केलेली आहेत त्या देयकावर कार्यकारी अभियंता सुखदेव काकड व कनिष्ठ अभियंता साहेबराव पाटील यांच्याच स्वाक्षऱ्या असल्याची माहिती खात्रीलायक सूत्राकडून मिळाली आहे आहे त्यामुळे हेच अधिकारी दोषी असल्याचे कळत आहे व पुन्हा तेच अधिकारी यां बोगस कामांची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमत आहे म्हणजे तू मारल्यासारखे कर मी रडल्यासारखे करतो अशी परिस्थिती सध्या जिल्हा परिषदमध्ये आहे म्हणुन दोषी असणाऱ्या अभियांत्यावर निलंबनाची कारवाई होऊन संबंधित बांधकाम एजेन्सीला काळ्या यादीत टाकण्यात यावे नसता २० जूनचे आत्मदहन आंदोलन होणारच आहे असे बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.