Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादछत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक 2026: प्रभाग 10 अ व 10 ब मध्ये...

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक 2026: प्रभाग 10 अ व 10 ब मध्ये ‘आप’ उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक 2026: प्रभाग 10 अ व 10 ब मध्ये ‘आप’ उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी/  छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 10 अ आणि 10 ब मध्ये राजकीय वातावरण तापले आहे. आम आदमी पार्टीचे नगरसेवक पदाचे उमेदवार सौ. उज्वला सुग्रीव मुंढे आणि वैजनाथ राठोड यांच्या झंझावाती प्रभाग दौऱ्यांमुळे नागरिकांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे.
दोन्ही उमेदवार घराघरांत जाऊन थेट जनतेशी संवाद साधत आहेत, नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्या सोबत प्रलंबित प्रश्नांवर ठोस भूमिका मांडत आहेत. स्वच्छ, पारदर्शक आणि कामावर केंद्रित राजकारणाचा संदेश देत, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज, आरोग्य सुविधा, शिक्षण आणि महिला सुरक्षेसारख्या मूलभूत विषयांवर त्यांनी मांडलेली भूमिका नागरिकांच्या मनाला भिडत आहे.
भाजप तसेच इतर पारंपरिक पक्षांतील नेते, आमदार व खासदार यांचे सातत्याने होणारे पक्षांतर पाहून नागरिकांमध्ये नाराजी वाढली असून, “निवडणूक आली की पक्ष बदलायचा आणि जनतेला विसरायचं” या प्रवृत्तीवर संतापलेल्या जनता आता आम आदमी पार्टीकडे आशेने पाहत आहे.
सौ. उज्वला सुग्रीव मुंढे यांनी महिलांसाठी सुरक्षितता, स्वच्छ परिसर आणि आरोग्य सुविधा मजबूत करण्यावर भर देण्याचे आश्वासन दिले आहे, तर वैजनाथ राठोड यांनी युवकांसाठी रोजगार संधी, मूलभूत सुविधा आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास प्राधान्यक्रम असल्याचे स्पष्ट केले आहे.
यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उमेदवारांचे स्वागत केले. “यावेळी बदल हवा”, “पक्षांतराला नाही, कामाला मत” अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटताना दिसत आहेत.
अरविंद केजरीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत सुग्रीव मुंढे हे प्रभागातील जनतेच्या अडचणी समजून त्यावर काम करणारे नेतृत्व म्हणून परिचित आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली हा प्रभाग आम आदमी पार्टीसाठी महत्त्वाचा ठरत असून, सौ. मुंढे आणि वैजनाथ राठोड यांच्या उमेदवारीमुळे प्रभागातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments