विषय : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे साजरा करत आहे स्वच्छता अभियान – 2025
नांदेड विभाग, दक्षिण मध्य रेल्वेमार्फत 1 ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीत स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने व्यापक स्वच्छता अभियान राबवले जात आहे. या अभियानाची सुरुवात रेल्वे कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना स्वच्छतेची शपथ देऊन करण्यात आली. नगरसोल, औरंगाबाद, जालना, परभणी आणि नांदेड रेल्वे स्थानकांवर आज रेल्वे कर्मचाऱ्यांनी स्वच्छता अभियान, स्वच्छतेची शपथ घेवून याची सुरुवात केली. त्यानंतर या पंधरवड्यात प्रभात फेरी, स्वच्छ रथ, नुक्कड नाट्य व जागृतीपर कार्यक्रमांद्वारे जनजागृती करण्यात येईल.
4 ऑगस्टपासून स्टेशन परिसर, कँटीन, पँट्री कार, रेल्वे पटरी , कार्यालये आणि रेल्वे कॉलनीमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल. प्लॅटफॉर्म्स प्लास्टिक-मुक्त करण्याबरोबरच स्वतंत्र कचरापेट्यांची व्यवस्था करण्यात येत आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.
अन्न विक्रेते, स्वयंपाकी व कँटीन कामगार यांच्यासाठी स्वच्छता व आरोग्य चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. NGOs, शाळा, स्काऊट-गाईडस, स्थानिक संस्था यांच्या सहभागातून जागृती मोहीम राबवण्यात येत आहे. सर्व पाणी स्रोत व गाळण प्रणालींची साफसफाई करून गुणवत्तेची तपासणी केली जात आहे.
जागृतीसाठी सेल्फी बूथ, ‘स्वच्छता हस्ताक्षर’ मोहिमा, तसेच बायो-टॉयलेट वापर प्रशिक्षण देखील दिले जात आहे. या मोहिमेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांची निवड करून त्यांचा गौरव 15 ऑगस्ट रोजी केला जाणार आहे.
आदरणीय संपादक साहेबांना विनंती आहे हि बातमी आपल्या वर्तमान पत्रात प्रसिद्ध करावी.
-आदरणीय संपादक साहेब
