Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबाद"राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धा 2025-26" "महाराष्ट्राचा संघ जाहीर"

“राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धा 2025-26” “महाराष्ट्राचा संघ जाहीर”

“राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धा 2025-26″

महाराष्ट्राचा संघ जाहीर

            क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आदेशान्वये जिल्हा क्रीडा परिषद, छत्रपती संभाजीनगर व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने सन 20२5-२6  या शैक्षणिक वर्षात 14,17,19वर्षाआतील मुले राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धा दिनांक 26 ते 29 नोव्हेंबर 2025 या कालावधीत विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा, छत्रपती संभाजीनगर येथे यशस्वीरित्या संपन्न झाले आहे.

            सदर क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या आठ विभागातील एकुण 250-300 खेळाडू मधून संचालनालयाअंतर्गत निवड करण्यात आलेल्या निवड समिती सदस्य यांचे मार्फत राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धमधून 14 वर्षे, 17 वर्ष व 19 वर्ष मुले या वयोगटांचा महाराष्ट्राचा संघ व राखीव खेळाडू जाहीर करण्यात आले. निवड समिती सदस्य म्हणून रितेश अनंतवार, हिमांशू गोडबोले, अतुल कुलकर्णी, मनोज कान्होरे,परीक्षीत पाटील, श्री. मिलिंद देशमुख यांची उपस्थिती होती. राज्यस्तरावरील अधिकृत तज्ञ पंच  म्हणून विजय भंडारे, श्रीरायु चौधरी, टंगसाळी सर, नचीकेत देशपांडे, निकुंज पांडे, देव कल्याणकर, वैष्णवी गुंडळे, आदित्य साळूंखे, कृष्णा सुर्यवंशी, तेजस जैन, अल्काम शेख, सार्थक वडवे यांचे सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments