18 वर्षानंतर जिल्हा परिषद प्रशाला साष्ट पिंपळगावला दहावी च्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
विहामांडवा
आत्ताच एक्सप्रेस
ज्ञानेश्वर पा गाभूड
साष्ट पिंपळगाव येथील जुनी जिल्हा परिषद शाळेमध्ये शनिवारी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात पार पडला.
18 वर्षानंतर शाळेत पुन्हा एकत्र येण्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता. कार्यक्रमास शाळेतील जेष्ठ शिक्षक देशमुख सर,नरोटे सर ( मुख्यध्यापक जिल्हा परिषद प्रशाला साष्ट पिंपळगाव) ,कुलकर्णी सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या यशस्वी जीवनात शिक्षकांनी दिलेल्या योगदानाबद्दल मनमोकळा संवाद साधला.
कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी सतिश जाधव,कृष्णा काळे,योगेश माने,अंगद राक्षे,मधुकर काळे यांनी पुढाकार घेतला.
कार्यक्रमास गणेश शिंदे,अमोल सुळे,सुरेश काळे,अय्यास शेख,ज्ञानेश्वर चौधरी,मंगेश नरवडे,सतीश माने,सुरेश झिंजुर्डे,मंगेश जगताप,संभाजी चौधरी,तोफिक आतार,शेफिक आतार, रवींद्र, चौधरी जुबेर शेख,सतिश भांडळकर, अर्जुन नरवडे,मंगल थोरवे,मंगल तांबडे,सुजाता कासुळे,शोभा हुंबे,जनाबाई सकट,राजकन्या गायकवाड,अंजली पटेकर,काजल राक्षे,सुनिता मोठे,अनिता जाधव,योगिता पैठणे,अश्विनी चव्हाण हे माजी विद्यार्थी उपस्थित होते.
सूत्रसंचालन शोभा हुंबे यांनी केले.तर आभार विहामंडावा महावितरण चे वरिष्ठ तंत्रज्ञ सतिश जाधव यांनी मानले शेवटी मनोरंजन चा कार्यक्रम करून स्नेह संमेलनाची सांगता करण्यात आली