पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यातून 176 उमेदवारांची निवड
छत्रपती संभाजीनगर – कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, छत्रपती संभाजीनगर मार्फत लोकनेते गोपीनाथराव मुंडे वंजारी भवन या ठिकाणी पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे व कार्यालयाच्या मॉडेल करिअर सेंटर हॉल व छत्रपती संभाजी कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जागेवरच निवड संधी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमांचे उद्घाटन इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे मंत्री हस्ते करण्यात आले. उपस्थित उमेदवारांना मार्गदर्शन करतांना मंत्री अतुल सावे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जिल्हयामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्रामध्ये वाढ होत आहे. यामाध्यमातून छत्रपती संभाजीनगर तसेच मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्थानिकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होत आहे. संधींचा आपण लाभ घेऊन आपले करीअर वृध्दींगत करावे तसेच या रोजगार मेळाव्यांमध्ये उपस्थित असलेल्या 25 उद्योजकांकडील रिक्त जागांवर आपल्या कौशल्य व प्रशिक्षणानुसार प्राप्त होणाऱ्या रोजगार संधीचा युवक युवतींनी लाभ घ्यावा असे आवाहन मंत्री अतुल सावे यांनी केले.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे वंजारी भवन येथे आयोजीत या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुने, माजी महापौर भगवान घडामोडे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे संहसंचालक पी.टी.देवतळे, कौशल्य विकास विभागाच्या उपायुक्त विद्या शितोळे, MIDC चे क्षेत्र व्यवस्थापक अशोक रसाळ आणि जिल्हा कौशल्य विका, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त एस.आर.वराडे आदी उपस्थित होते. मेळाव्याचे प्रास्ताविक विद्या शितोळे यांनी तर आभार प्रदर्शन सुरेश वराडे यांनी केले.
या रोजगार मेळाव्यामध्ये व्हेरॉक इंजिनिअरींग लि. , कॅनपॅक इंडिया प्रा. लि., कॅनपॅक इंडिया प्रा. लि. ग्लास बॉटल बीआर, टि. के. प्रेसिजन प्रा.लि., रूचा इंजिनियरींग प्रा.लि., एवेरलंस इंडिया प्रा.लि., मेटलमन ऑटो लि., श्रेया लाईफ सायन्सेस प्रा.लि., अलंकार इंजिनीअरींग ईक्युपमेंट प्रा.लि., सवेरा फार्मा प्रा.लि., कॉस्मो फिल्म्स लि. शेंद्रा, रेडिको एन व्ही डिस्टीलीरीज महाराष्ट्र लि., रत्नप्रभा मोटर्स महिंद्रा, साई सु्प्रिम इक्युपमेंट., कॉस्मो फिल्म्स लि. वाळूज, रूचा इंजिनियरींग प्रा.लि. शेंद्रा, एन आर बी बेअरिंग लि. शेंद्रा, इत्यादी. इ. नामांकीत कंपन्यांनी सहभागी होऊन उपस्थित उमेदवारांच्या मुलाखती घेऊन 176 उमेदवारांची निवड केली.
