श्री दादागुरू यांच्या अखंड निराहार तपस्येला १७०० दिवस पूर्ण, कृषी क्रांती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जालनाच्या अंतर्गत १७०० वृक्षारोपण उपक्रमाची
भव्य सुरुवात
जालना – सनातनी संस्कृतीतील एक अत्यंत अद्भुत आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असलेले श्री दादागुरू यांचा अखंड निराहार महाव्रत तपस्या १३ जून २०२५ रोजी १७०० दिवस पूर्ण करून एका ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचला आहे. या महत्त्वाच्या दिवशी जालना जिल्ह्यात दादागुरू यांच्या तपस्येला अभिवादन करण्यासाठी व पर्यावरण संवर्धनासाठी ‘१७०० वृक्षारोपण’ मोहिमेची भव्य सुरुवात करण्यात आली.
दादागुरू हे नर्मदा मिशनचे संस्थापक असून, गेल्या पाच वर्षांपासून (१७०० दिवसांहून अधिक) त्यांनी फक्त नर्मदा जल ग्रहण करत अखंड निराहार महाव्रत साधना करत आहेत. या कठीण आणि अविश्वसनीय तपस्येमुळे दादागुरू यांचे जीवन या सदीतील सर्वात मोठे रहस्य मानले जाते. राज्य सरकारने त्यांच्यावर संशोधन करण्याचा आदेश दिला असून विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन संस्था देखील त्यांच्या जीवनशैलीचा अभ्यास करण्यास उत्सुक आहेत. अमेरिकेसह इतर अनेक देशांमधूनही त्यांचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव आला आहे.
दादागुरूंचा हा महाव्रत हा केवळ एक तपस्या नाही तर तो एक संकल्प आहे, जो भारताला स्वस्थ, समर्थ व आत्मनिर्भर बनवण्याचा संदेश देतो. त्यांचा हा अनोखा उपक्रम सनातनी संस्कृतीच्या तत्त्वज्ञानाला चालना देत, निसर्गाशी निष्ठा आणि पर्यावरण संवर्धनाचा मूळ संदेश आपल्याला देतो.
या ऐतिहासिक दिवसाला दादागुरूंच्या तपस्येच्या सन्मानार्थ आणि पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने जालना येथील दादागुरू गुरू परिवार व कृषिक्रांती बहुद्देशीय सेवाभावी संस्थेने संयुक्तपणे १७०० वृक्षारोपण मोहिमेची सुरुवात केली. हा उपक्रम जालना साई धाम, सिंदखेडराजा रोड येथील साई धाम परिसरात श्री महंत रामचंद्र गणेश बन गोसावी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत व आशीर्वादाने पार पडला.
कार्यक्रमामध्ये कृषिक्रांती संस्थेचे अध्यक्ष सतीश मुसळे, उपाध्यक्ष गजानन पालवे, सचिव रितेश देशमुख, शिवकुमार अवचार आणि युवा बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष जयपाल राठोड यांनी विशेष सहभाग घेतला. या वृक्षारोपण मोहिमेत स्थानिक नागरिक ज्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी एकत्र येण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
वृक्षारोपण उपक्रमाचा उद्देश केवळ परिसराची हरितक्रांती करणे नाही, तर दादागुरू यांच्या तपस्येचा संदेश, निसर्गाशी जपलेली निष्ठा आणि निष्काम सेवा या तत्त्वांची जनजागृती करणे हा आहे. नर्मदा नदीच्या पवित्र जलाप्रमाणेच या वृक्षांनीही जालना परिसरातील पर्यावरण सुधारण्यात मोलाची भूमिका बजावली पाहिजे, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली.
या मोहिमेमुळे जालना जिल्ह्यात पर्यावरण संवर्धनासाठी नवीन जागृती निर्माण होणार असून, लोकांमध्ये निसर्गाशी जुळवून घेत स्वस्थ जीवनशैली अंगीकारण्याची प्रेरणा मिळेल, असे मत सहभागी व्यक्तींनी व्यक्त केले. तसेच या उपक्रमाद्वारे भविष्यातही विविध सामाजिक, पर्यावरणीय आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
दादागुरूंच्या तपस्येने जगाला शिकवले आहे की, साक्षात् निसर्गाशी जोडून रहाणे व त्याच्या सेवेत लागणे हीच खरी साधना आहे. त्यांच्या या तपस्येच्या १७०० दिवसांच्या व्रतपूर्तीनिमित्ताने सुरू झालेला वृक्षारोपण उपक्रम केवळ जालना जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण नर्मदापथावर पर्यावरण रक्षणात मोलाचा ठरावा, अशी आशा आहे.