Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादसुंदरवाडी उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमतावाढ; 15 हजार ग्राहकांना मिळणार अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा

सुंदरवाडी उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमतावाढ; 15 हजार ग्राहकांना मिळणार अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा

सुंदरवाडी उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमतावाढ;

15 हजार ग्राहकांना मिळणार अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा

छत्रपती संभाजीनगर : शेंद्रा एमआयडीसीसह सुंदरवाडी परिसरातील ग्राहकांना खंडित व दर्जेदार वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणने सुंदरवाडी 33 केव्ही उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमतावाढ केली आहे. 10 एमव्हीएचा ट्रान्सफॉर्मर शुक्रवारी (26 सप्टेंबर) रात्री कार्यान्वित करण्यात आला. यामुळे सुमारे 15 हजार वीजग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

या उपकेंद्रात आधी 5 एमव्हीए क्षमतेचे तीन ट्रान्सफॉर्मर होते. उपकेंद्रातून परिसरातील जवळपास 27 हजार ग्राहकांना वीजपुरवठा करण्यात येतो.  मात्र दिवसेंदिवस वाढणारी ग्राहकांची संख्या व विजेच्या मागणीमुळे सुरळीत वीजपुरवठा करण्यात अडथळा निर्माण होत होता. यावर उपाय म्हणून छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य  अभियंता पवनकुमार कछोट यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन सेवाजोडणी योजनेत उपकेंद्रातील एका 5 एमव्हीएच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमतावाढ करून तो 10 एमव्हीए करण्यात आला. आता उपकेंद्रातील तिन्ही पॉवर ट्रान्सफॉर्मरची एकत्रित क्षमता 20 एमव्हीए झाल्याने ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा मिळणार आहे. यात छत्रपती संभाजीनगर शहरातील विमानतळ शाखेचा भाग, तालुक्यातील शेंद्रा एमआयडीसी, सुंदरवाडी, झाल्टा, निपाणी, टाकळी शिंपी, टाकळी वैद्य व भालगाव या गावांतील ग्राहकांना प्रामुख्याने याचा लाभ होणार आहे.

ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित करताना ग्रामीण-2 उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता भाऊसाहेब साळुंके, चाचणी विभागाचे सहायक अभियंता विवेक थोरवे, शेंद्रा एमआयडीसी शाखेचे सहायक अभियंता संभाजी अथरगण, चिकलठाणा ग्रामीण शाखेचे सहायक अभियंता भालचंद्र जाधव यांच्यासह अभियंते, कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments