केंद्र सरकारच्या ११ वर्षाच्या यशस्वी कार्यकाळा निमित्ताने फुलंब्री येथे विकसित भारत संकल्प सभा उत्साहात संपन्न
फुलंब्री/प्रतिनिधी/ केंद्र सरकारच्या ११ वर्षाच्या यशस्वी कार्यकाळा निमित्ताने फुलंब्री येथे काल दिनांक २० जुन शुक्रवार २०२५ रोजी विकसित भारत संकल्प सभा उत्साहात संपन्न झाली.
यावेळी आमदार अनुराधा चव्हाण यांनी नरेंद्र मोदी यांच्या अकरा वर्षाच्या कार्यकाळातील अनेक योजनांची माहिती देऊन जनसामान्य नागरिकांना त्याचा कसा फायदा झाला हे सांगितले .
तसेच जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाठ यांनी पुढील काळात सरकारच्या योजनांचा फायदा सामान्य नागरिकांना व्हावा यासाठी नागरिकांना मदत करण्याचे कार्यकर्त्यांना आव्हान केले.
याप्रसंगी शिवाजी पाथ्रीकर, मंडळाचे अध्यक्ष सुचित बोरसे , जितेंद्र जैस्वाल , सांडू आण्णा जाधव , इलियास शहा, आप्पासाहेब काकडे, कल्याण चव्हाण, बाळू सोटम,सौ.ऐश्वर्या गाडेकर, योगेश मिसाळ, गोपाल वाघ, बाळू तांदळे, राजेंद्र डकले, गजानन नागरे, नाथा काकडे, रोशन अवसरमल, कलीम पटेल, विलास आटोळे यांच्या सह बूथप्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख यांच्या सह आदींची कार्यकर्त्यांची उपस्थिती होती,
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक नरेंद्र देशमुख यांनी केले.