Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादबीड बायपास सर्व्हिस रोडवर 118 अतिक्रमण निष्कासित

बीड बायपास सर्व्हिस रोडवर 118 अतिक्रमण निष्कासित

बीड बायपास सर्व्हिस रोडवर 118 अतिक्रमण निष्कासित
मनपा/ छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक  जी.श्रीकांत यांचे आदेशानुसार आणि अतिक्रमण विभाग प्रमुख संतोष वाहुळे यांच्या उपस्थितीत आज दिनांक 3 जून 2025 रोजी बीड बायपास सर्व्हिस रोड वरील अतिक्रमण निर्मूलन कारवाई मध्ये ११८ दुकाने,हॉटेल्स, बॅंकेचे अतिरिक्त बांधकाम,हॅास्पीटल समोरील वाढीव बांधकामे, शेडस ,  टपऱ्या,इ. अतिक्रमण निष्कासित करण्यात आले.
तसेच विविध आस्थापनांना १ लाख ३५ हजारांचा दंड करण्यात आला आहे.
सदरील कारवाई साठी खालील प्रमाणे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
सहाय्यक आयुक्त अतिक्रमण विभाग सविता सोनवणे,
सहाय्यक आयुक्त भरत भिरारे ,राहुल जाधव, अर्जुन गिराम नगररचना विभागाचे अभियंता शिवाजी लोखंडे , सौरभ साळवे ,सुरज सवणडकर, इमारत निरीक्षक शिवम घोडके, कुणाल भोसले, रवींद्र देसाई, सागर श्रेष्ठ, अशोक कदम नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव व कर्मचारी
विद्युत विभागाचे लाईनमन,
यांत्रिकी विभागाचे जेसीबी चालक , टिप्पर चालक,  वाहन चालक  इत्यादी उपस्थित होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments