वंचित बहुजन आघाडीतर्फे जालना शहरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंती निमित्त अभिवादन
जालना/प्रतिनिधी/ भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंती निमित्त जालना शहरातील अंबड चौफुली जवळ मंठा बायपास रोड वर असलेल्या वंचित बहुजन आघाडी मराठवाडा विभागीय जनसंपर्क कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थितांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष अँड.अशोक खरात, मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके, जालना महानगरपालिका निवडणूक -२०२६ , वंचित बहुजन आघाडी प्रभाग १६ चे अधिकृत उमेदवार १ अमोल लोखंडे, २ डॉ.दिपक भालेराव, ३ सुवर्णा मुंढे,४ रमाताई होर्शिळ,प्रभाग १३ चे अधिकृत उमेदवार १ सत्यपाल गायकवाड,२ मायाताई वानखेडे प्रभाग ४ चे अधिकृत उमेदवार १ गौतम काकडे,२ निलाबाई काकडे यांच्या सह वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक राजेंद्र खरात, जिल्हा उपाध्यक्ष शेख लालाभाई,जिल्हा उपाध्यक्षा मैनाताई खंडागळे, सुशीलाताई गायकवाड , छायाताई रत्नपारखे,जेष्ठ नेते विष्णु खरात, जेष्ठ नेते शेषराव गायकवाड,माथाडी कामगार शहर अध्यक्ष राज आदमाने, संजय आदमाने,तालुका उपाध्यक्ष विलास नरवडे, नितीन बाळराज, गंगुबाई साबळे गौतम पाडमुख, संतोष मगर,राजु भोसले, बबन हिवाळे, संजय उघडे,संकेत दांडगे, राहुल वानखेडे यांच्या सह वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.