म्हैसमाळात पाच हजार विद्यार्थ्यांनी केले ११ हजार १११ झाडांचे वृक्षारोपण
एक पेड माँ के नाम” आमदार बंब यांच्या प्रमुख उपस्थितीत केला अभिनव उपक्रम
वंदे मातरम् ,भारत माता की जय, झाडे लावा झाडे जगवा या जय घोषाने म्हैसमाळ दुमदुमले
खुलताबाद/प्रतिनिधी/ श्रावणमास व श्रावणी सोमवार याचे विशेष महत्त्व आपल्या धार्मिक ग्रंथात उल्लेखित आहे. याचाच आधार घेत आई वडील, पुण्यजन, साधू संत, डोळ्यासमोरील आदर्श व्यक्तीमत्व अशा स्मृतींना स्मरण करून चांगल्या भावार्थाने वृक्षारोपण करा, आपण वृक्ष तोडतो पण त्या ठिकाणी नवीन वृक्ष लागवड करत नाही, प्रत्येक शेतकऱ्याने आपापल्या शेताच्या बांधावर वृक्ष लागवड केली पाहिजे, त्यामुळे वातावरणाचा समतोल टिकुन राहिल शुद्ध हवा (ऑक्सिजन) सर्वांना मिळेल चांगले पर्जन्यमान राहील व आपला मतदारसंघ सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही असे आवाहन करत गंगापूर व खुलताबाद तालुक्यातील पाच हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वंदे मातरम, भारत माता की जय, झाडे लावा झाडे जगवाच्या जय घोषाने अवघे म्हैसमाळ दुमदुमले या ठिकाणी तब्बल ११ हजार १११ झाडांचे वृक्षारोपण आमदार प्रशांत बंब यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. खुलताबाद तालुक्यातील म्हैसमाळ येथे सोमवार दि.११ रोजी सकाळी ११ हजार १११ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. दरम्यान विविध शाळेतून आलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने वृक्षदिंडी काढत मोठ्या उत्साहात वृक्षारोपण केले. यावेळी तहसीलदार स्वरुप कंकाळ, गटविकास अधिकारी प्रकाश नाईक, वन संरक्षण अधिकारी निखिल देशमुख,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश वाकळे,तालुकाध्यक्ष प्रकाश चव्हाण, गंगापूर तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजपचे जिल्हा सरचिटणीस सतीश दांडेकर भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमोल जाधव, विधानसभा निवडणूक प्रमुख विकास कापसे, माजी जि.प. सदस्य एल.जी. गायकवाड, माजी जि.प. सभापती भिमराव खंडागळे, पस दिनेश अंभोरे, गणेश अधाने,भाजपा माजी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर नलावडे, शहराध्यक्ष परसराम बारगळ , सुरेश मरकड, योगेश बारगळ, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष मुख्तार पठाण, अविनाश कुलकर्णी , दिनेश कायस्थ,प्रशांत गदानकर, राजेंद्र बढे , अरुण पाटे,मुकेश राजपूत,बाबासाहेब वीर,रावसाहेब देशमुख , अंकुश काळे, सतिश खंडागळे, अविनाश वेताळ,योगेश काळे, बाळु नलावडे, अनिल करपे, राजेंद्र राठोड, राहुल निकुंभ, अमोल गवळी,बाळु होळकर, अंकुश होळकर, राहुल चव्हाण,गुलाब कुचे,बंडू शिंदे, शिवाजी गायकवाड, राजु आवारे, वनरक्षक, शासकीय कर्मचारी, शिक्षक,भाजप पदाधिकारी,कार्यकर्ते यांचे सह मोठ्या संख्यांनी नागरिक उपस्थितीत होते.
राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गंगापूर खुलताबाद मतदारसंघात आमदार प्रशांत बंब यांच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत तब्बल पंचवीस हजार झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले असून त्यातील किमान ९० टक्के झाडे जगवण्यात येईल अशाच ठिकाणी ते लावण्यात आले आहे.
दरम्यान यावेळी वाळूज येथील काही शाळा काही विद्यार्थ्यांनी डोळ्या वरती पट्टी बांधून त्या – त्या वर्गातील कुठल्या ही पुस्तकाचे पान नंबर काढून त्याचे बिनचूक पणे वाचन करून दाखवत उपस्थितांचे मने जिंकली.
अभियानाची विशेषता :-
निसर्गाचा समतोल राहावा व भविष्यातील पिढीला निसर्गाची प्रत्यक्ष माहिती होऊन निसर्गाबद्दल प्रेम निर्माण होणे, आस्था निर्माण होणे या उदात्ते हेतूने या अभियानात प्रत्येक ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात आले.
वृक्षारोपणासाठी वनीकरण विभागाकडून वृक्षांची रोपे उपलब्ध करून देण्यात आली विशेष म्हणजे ज्या ठिकाणी ही झाडे ९० टक्क्यांपेक्षा जास्त जगतील अशाच ठिकाणी या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे.
