दिव्यांग, जेष्ठांना कृत्रिम साहित्य देण्यासाठी १०६७ जणांची तपासणी
खा.बजरंग सोनवणे यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन
केज/प्रतिनिधी/ जिल्हा समाज कल्याण विभाग बीड व एलिम्को मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने बीड जिल्ह्यामध्ये दिव्यांगांना व जेष्ठ नागरीकांना मोफत कृत्रिम साहित्य साधने वाटप करण्याच्या अनुषंगाने दि.१८ जुलै रोजी पंचायत समिती येथे पूर्व तपासणी शिबीर संपन्न झाले. शिबीराचे उद्घाटन खा.बजरंग सोनवणे यांच्या हस्ते झाले असून शिबीरात १०६७ जणांची तपासणी करण्यात आली.
यावेळी तहसीलदार गिड्डे, समाज कल्याण अधिकारी मेश्राम, गटविकास अधिकारी दिवाने, डॉ.थोरात, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गवळी, गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर,अलिम्को संस्थेची सर्व टिम, ज्ञानेश्वर चौरे, शंकर जाधव, पिंटू ठोंबरे, बंडू चौधरी यांची उपस्थिती होती. शिबीरामध्ये दिव्यांगांना जयपुरी फुट, कृत्रिम हात, कॅलीपर, व्हिलचेअर, ट्रायसिकल, क्रचेस, वॉकींग स्टीक, ब्रेल किट, स्मार्ट फोन, श्रवणयंत्र या सह जेष्ठ नागरीका करीता बेल्ट, वॉकर, काठया, चष्मे, कृत्रिम दात, खुबड, कृत्रिम अवयव, कानाची मशिन, व्हिलचेअर कमोडसहीत, सिलीकॉन खोम तकीया, नीब्रेस, स्पायनल सपोर्ट, सरवायकल कॉलर या सह इतर साहित्य वाटप करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने पुर्व तपासणी शिबीर त्या-त्या तालुक्यातील पंचायतसमितीमध्ये आयोजित करण्यात येत आहे. दि.१८ जुलै रोजी केज येथे सदर शिबीराचे उद्घाटन खा.बजरंग सोनवणे यांच्या हस्ते झाले.