दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्र
परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
जालना :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (बारावी) दि. 24 जून 2025 ते 16 जुलै 2025 या कालावधीत जालना जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. तरी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त शक्तीचा वापर करुन अपर जिल्हादंडाधिकारी गणेश महाडिक यांनी परीक्षा केंद्राचे 100 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
इयत्ता बारावीची परीक्षा 1)जे.ई.एस. कॉलेज, जालना 2) मत्स्योदरी आर्टस अॅण्ड सायन्य कॉलेज, अंबड 3) एल.बी.एस.आर्टस अॅण्ड कॉमर्स ज्युनीयर कॉलेज, परतूर 4) रामेवर, आर्टस अॅण्ड कॉमर्स ज्युनियर कॉलेज, भोकरदन
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) दि. 24 जून ते 8 जूलै 2025 या कालावधीत जालना जिल्ह्यातील 1) उर्दू हायस्कुल, कचेरी रोड़, जुना जालना. 2) सेन्ट जॉन्स इंग्लीश स्कुल, साई नगर, जालना. 3) समर्थ विद्यालय, पाचोड रोड, अंबड. 4) जिल्हा परिषद हायस्कुल, घनसावंगी. 5) श्री.योगानंद माध्यमिक विद्यालय, परतूर 6) रेणुका विद्यालय, मंठा या 6 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे.
केंद्राचे परिसरात अशांतता निर्माण होवून परीक्षा कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने परीक्षा उपकेंद्राच्या 100 मीटर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखणे प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणुन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागु करण्यात आले आहे.
आदेशात नमुद कालावधीकरीता सर्व सार्वजनिक टेलिफोन, एसटीडी बंद ठेवणेकरीता याद्वारे प्रतिबंधात्मक आदेश लागु केले आहे. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी नोटीस देण्यास पुरेसा कालावधी नसल्याने व परीक्षा सुरळीत पार पाडण्याचे दृष्टीने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (2) नुसार सदर आदेश एकतर्फी काढण्यात आला आहे. सदर आदेशाची प्रसिध्दी पोलीस अधिक्षक, जालना यांनी ध्वनिक्षेपकाद्वारे करावी. हा आदेश परीक्षेच्या दिवशी सकाळी 9 वाजेपासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत अंमलात राहील. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.
