Saturday, October 25, 2025
Homeऔरंगाबादव्हालीबॉल स्पर्धेत पी.एम श्री जि. प.मा.कन्या शाळेचा १७ वयोगटातील संघ जिल्हास्तरावर प्रथम...

व्हालीबॉल स्पर्धेत पी.एम श्री जि. प.मा.कन्या शाळेचा १७ वयोगटातील संघ जिल्हास्तरावर प्रथम १४ वर्षे वयोगटातील संघ उपविजेता माजलगाव प्रतिनिधी शेख हमीद महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडा संचलनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बीड यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येत असलेल्या शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये व्हालीबॉल स्पर्धेच्या जिल्हास्तरीय सामन्यात पी.एम श्री जिल्हा परिषद माध्यमिक कन्या शाळा माजलगाव येथील १७ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने जिल्हास्तरावर सर्वप्रथम परळी संघाला हरवून अंतिम सामन्यात अंबाजोगाई संघासोबत १५-२५, १३-२५ ने दणदणीत विजय मिळवून प्रथम येत घवघवीत यश संपादन केले आहे.विभागस्तरावर होणाऱ्या स्पर्धेत विजयी संघ बीड जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे. तर १४ वर्षे वयोगटातील मुलींचा संघ उपविजेता ठरला आहे.विजयी संघाला प्रशिक्षक अब्दुल शेख व राजकुमार सोनपसारे यांचे मार्गदर्शन मिळाले.१७ वर्षे विजयी संघात कर्णधार अक्षरा पवार,शितल राठोड,सोमेश्वरी टाक,साक्षी कुलकर्णी,अंजली कुंभार,रूची दळवी,अनन्या चव्हाण,शितल वावळकर,पुनम राठोड,अलिना शेख या खेळाडूंचा समावेश आहे. या यशाबद्दल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी रवींद्र महामुनी,तालुका क्रीडा अधिकारी अनिकेत काळे, बीड तालुका क्रीडाधिकारी होसुरकर,क्रीडा संयोजक सचिन मोती,शेख शारेक,तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा फरहाना पठाण व सदस्य,शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद गरबडे,सहशिक्षक मधुकर मकसरे, बाळासाहेब सोनसळे,शरद नायबळ,सुंदर काळे,नारायण भाळशंकर,चंद्रकांत यादव,बालासाहेब कांबळे,हनुमान शेरकर,सौदागर हसीब,सहशिक्षिका मंदा सारूक,संगीता राठोड,ज्योती कोडगीरकर,जयश्री लोणीकर,संगीता शिंदे,अंबिका कुचेकर,शितल राठोड,हिरा मगर,आसमा शेख, अनिता पौळ,गोरख उघडे,संतोष साळवे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत

व्हालीबॉल स्पर्धेत पी.एम श्री जि. प.मा.कन्या शाळेचा १७ वयोगटातील संघ जिल्हास्तरावर प्रथम
१४ वर्षे वयोगटातील संघ उपविजेता
माजलगाव/प्रतिनिधी/ महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडा संचलनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बीड यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येत असलेल्या शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये व्हालीबॉल स्पर्धेच्या जिल्हास्तरीय सामन्यात पी.एम श्री जिल्हा परिषद माध्यमिक कन्या शाळा माजलगाव येथील १७ वर्षे  वयोगटातील मुलींच्या संघाने जिल्हास्तरावर सर्वप्रथम परळी संघाला हरवून अंतिम सामन्यात अंबाजोगाई संघासोबत १५-२५, १३-२५ ने दणदणीत विजय मिळवून प्रथम येत घवघवीत यश संपादन केले आहे.विभागस्तरावर होणाऱ्या स्पर्धेत विजयी संघ बीड जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे. तर १४ वर्षे वयोगटातील मुलींचा संघ उपविजेता ठरला आहे.विजयी संघाला प्रशिक्षक अब्दुल शेख व राजकुमार सोनपसारे यांचे मार्गदर्शन मिळाले.१७ वर्षे विजयी संघात कर्णधार अक्षरा पवार,शितल राठोड,सोमेश्वरी टाक,साक्षी कुलकर्णी,अंजली कुंभार,रूची दळवी,अनन्या चव्हाण,शितल वावळकर,पुनम राठोड,अलिना शेख या खेळाडूंचा समावेश आहे.
    या यशाबद्दल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी रवींद्र महामुनी,तालुका क्रीडा अधिकारी अनिकेत काळे, बीड तालुका क्रीडाधिकारी होसुरकर,क्रीडा संयोजक सचिन मोती,शेख शारेक,तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा फरहाना पठाण व सदस्य,शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद गरबडे,सहशिक्षक मधुकर मकसरे, बाळासाहेब सोनसळे,शरद नायबळ,सुंदर काळे,नारायण भाळशंकर,चंद्रकांत यादव,बालासाहेब कांबळे,हनुमान शेरकर,सौदागर हसीब,सहशिक्षिका मंदा सारूक,संगीता राठोड,ज्योती कोडगीरकर,जयश्री लोणीकर,संगीता शिंदे,अंबिका कुचेकर,शितल राठोड,हिरा मगर,आसमा शेख, अनिता पौळ,गोरख उघडे,संतोष साळवे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments