लासुर स्टेशन गिताबन येथे अवैध रित्या गुटखा विक्री करणाऱ्या गुटखा किंगवर अन्न भेसळ व शिल्लेगाव पोलिसांची संयुक्त कारवाई
आत्ताच एक्सप्रेस गंगापूर प्रतिनिधी गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन गिताबन येथील जय महेश ट्रेडर्स या दुकानात राज्य शासनाने बंदी घातलेला सुगंधी तंबाखू व गुटखा विक्री होत असल्याची माहिती गोपनीय सूत्रमार्फत शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस व अन्नभेसळ विभागाचे अन्नसुरक्षा अधिकारी श्रीनिवास केदार यांना मिळाली त्यावरून  बुधवारी ३० जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक वीरेंद्र राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग, यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न भेसळ यांची संयुक्त कारवाई करून जय महेश ट्रेडर्स या दुकानाची झाडझडती घेतली असता महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला गुटखा व सुगंधी तंबाखू मिळुन आली ज्याची किंमत २८ हजार रुपये असून अवैध रित्या गुटखा विक्री करणाऱ्या गुटखा किंग दुकानचे मालक भरत सोनी याच्यावर शिल्लेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सलीम चाऊस, अन्नसुरक्षा अधिकारी श्रीनिवास केदार, गुणवत्ता निरीक्षक अमोल कांबळे, बिट अंमलदार तातेराव बेंद्रे,पोलीस काँस्टेबल राजेंद्र निसर्ग,आदींनी केली.