रामजीनगर येथे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती साजरीआत्ताच एक्सप्रेससोयगाव/प्रतिनिधी/ सोयगाव केंद्रातील जिल्हा परीषद प्राथमिक शाळा रामजीनगर येथे भारतरत्न,भारताचे माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती मान्यवरांच्या उपस्थित साजरी करण्यात आली.यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात होते.यावेळी मुख्याध्यापक किरण पाटील यांनी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्याना माहीती दिली.यावेळी नगरसेवक गजानन कुडके, ज्येष्ठ पत्रकार विजय पगारे, समाजसेवक राजू कुडके, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा वैशाली पवार, शिक्षण प्रेमी ,सदस्या मनिषा जेठे, पालक अमृत साबळे यांच्यासह विद्यार्थी,मुख्याध्यापक,शिक्षक, पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
