महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन तथा बी टी ऍक्ट 1949 रद्द करणे बाबत
भंते विनाचार्य यांच्या जनसंवाद यात्रेचे पवित्र चैत्यभूमी येथे समापन तथा आंबेडकर भवन आभार सभेचे आयोजन.
मुंबई/प्रतिनिधी/ महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन तथा बी टी ऍक्ट 1949 रद्द करणे बाबत…….भंते विनाचार्य यांच्या जनसंवाद यात्रेचे पवित्र चैत्यभूमी येथे समापन तथा आंबेडकर भवन आभार सभेचे आयोजन.
भंते विनाचार्य यांच्या जनसंवाद यात्रेची सुरुवात पवित्र दीक्षाभूमी येथून दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी पूजा भदंत ज्ञान ज्योती,भदंत हर्षबोधी,भदंत दिपंकर सुमेध, भारतीय अभिनेता हिमांशू सोनी,कार्यकारी अध्यक्ष आयू. भिमराव आंबेडकर भारतीय बौद्ध महासभा यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.महाराष्ट्र राज्याच्या विविध जिल्ह्यांमधून ही यात्रा चैत्यभूमीकडे येत आहे. या यात्रेच्या प्रथम चरण पवित्र चैत्यभूमी या ठिकाणी समापन होणार असून,आभार सभेचे आयोजन डॉक्टर आंबेडकर भवन दादर पूर्व या ठिकाणी नियोजन केलेले आहे.
भंते विनाचार्य यांना महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनात खोटे गुन्हे दाखल करून या राज्याच्या तुरुंगात कारावास करावा लागला व त्यांना 68 दिवस तुरुंगात राहावं लागले. महाबोधी महावीराच्या मुक्तीचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी या जनसंवाद यात्रेचे आयोजन बुद्धिस्ट समन्वय संघ तथा भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेले आहे.दिनांक 2 सप्टेंबर रोजी ही यात्रा मुंबईकडे येत असल्याने बौद्ध भिक्ष संघ,उपासक तथा उपासिका यांना आवहान करण्यात येत आहे की, या ऐतिहासिक आभार सभेला हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवहान भंते विनाचार्य यांनी केले आहे.सदर माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे बुद्धिस्ट समन्वय संघ द्वारे निमंत्रण म्हणून नितीन गजभिये यांनी कळविले आहे.