Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादमराठवाडा मुक्तिदिनाच्या निमीत्ताने

मराठवाडा मुक्तिदिनाच्या निमीत्ताने

मराठवाडा मुक्तिदिनाच्या निमीत्ताने

स्वतंत्र भारतामध्ये विनाअट सामील होऊन मराठवाड्यातील जनतेने चुक केली काय  ?

 दोन दिवसानंतर 17 सप्टेंबर रोजी आपण आता मराठवाडा मुक्ती दिन साजरा करणार आहोत. मागे वळून पाहतांता असे निदर्शनात येते की, मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्याच्या फक्त वल्गना करण्यात आल्या आणि मराठवाड्याच्या जनतेच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. खरंच आमच्या मराठवाड्यातील जनता  पूर्वीपासून अतिशय सहनसिल  देशभक्त आहे. त्यांनी कोणतेही  अट न घालता ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस विनाअट मराठवाडा स्वतंत्र भारतामध्ये सामील झाला.खरे म्हणजे त्या वेळचे जे आमचे स्वतंत्र सेनानी होते जे आमचे मराठवाड्याचे नेते होते ते अटी घालू शकले असते आणि मराठवाड्याचा विकासाचा अजेंडा पुढे ठेवू शकले असते. देशाभिमान राष्ट्रनिष्ठा यामुळे त्यावेळच्या लोकनेत्यांनी कोणत्या कोणत्याही अटी न घालता प्रथम प्राधान्य देशाला देवुन स्वतंत्र भारतामध्ये सामील होण्याचे ठरवले . मराठवाडा स्वतंत्र भारतामध्ये सामील झाला. परंतु मराठवाड्याच्या वाट्याला सतत उपेक्षाच आलेली आहे. आज कोणत्याही क्षेत्राचा विचार करा, शैक्षणिक क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये सर्वच क्षेत्रांमध्ये मराठवाडा इतर भागांपेक्षा कोसो दूर आहे.आता मराठवाड्यामध्ये जो आरक्षणाचा लढा लढला जात आहे त्याला मराठवाड्याची उपेक्षा हेच कारण आहे. अगोदर रजाकारांनी लुटले त्यातून जनता सावरते न सावरते तो भारतामध्ये लोकशाही राज्य आले. मराठवाड्यातील जाणत्या देशभक्त जनतेला आनंद झाला. आनंदाचे गीत मराठवाड्यामध्ये गायले गेले. परंतु लोकशाहीमध्ये निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा मराठवाड्याची उपेक्षाच केली . स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेला वापरून घेतले. जनतेचा एकही प्रश्न न सोडवता फक्त स्वतःचा स्वतःच्या कुटुंबाचा आणि सोयऱ्याधायर्‍यांचाच प्रश्न सोडवण्यामध्ये गुंतले. काही मोजके नेते सोडता मराठवाड्यातील लाचार नेत्यांच्यामुळे महाराष्ट्राकडून सतत मराठवाड्याची उपेक्षा झालेली आहे. त्यामध्ये पूर्वीपासून  शिक्षणाच्या समस्या सोडवल्या गेल्या नाहीत आता आता शिक्षणासाठी काही तरतूदी झाल्या त्या सुद्धा पुरेशा नाहीत . मराठवाड्यातील नोकरशाहीचा विचार केला तर स्थानिक भूमिपुत्र आजही  मराठवाड्याच्या प्रशासनामध्ये तुलनेने अतिशय कमी आहेत. त्यामानाने इतर भागातून पश्चिम महाराष्ट्र तसेच विदर्भातून  मोठ्याप्रमाणात नौकरवर्ग  मराठवाड्यामध्ये नोकरी करत आहे.शिक्षण नाही!असले तरी  नौकरी नाही नोकरी नाही त्यामुळे लग्नाचा प्रश्न .असे एक ना अनेक प्रश्न मराठवाड्यामध्ये सध्या चर्चेत असतानाही राजकर्ते या गोष्टीकडे लक्ष देत नाही त. मरणाचे कष्ट मेहनत करूनही आमच्या वाट्याला सतत दुःख दारिद्र्य येत आहे. कृषी क्षेत्राचा विचार केल्यास न परवडणारी शेती शेतकरी करत असून सर्वाधिक आत्महत्या मराठवाड्यामध्ये झालेल्या आहेत. आजही मराठवाडा भ्रष्टाचाराने होरपळत आहे.स्थानिक नेते मात्र स्वतःचा स्वार्थ आणि स्वतः कुटुंबाचा स्वार्थ पाहण्यात आणि पैसे कमाव धन्यता मानत आहे.आता त्यांच्या रजाकिरीला जनता तोंड देत आहे. जनतेला वाऱ्यावर सोडून त्यांनी इतर नेत्यांची लाचारी पत्करलेली आहे औद्योगिक क्षेत्रामध्ये फक्त नावाला औद्योगिक शब्द उच्चारला गेला परंतु पाहिजे त्या प्रमाणामध्ये  कारखानदारी मराठवाड्यात उभे राहू शकले नाही. त्या ठिकाणी सुद्धा आमच्या नेत्यांनी लक्ष दिलेले नाही. आता यापुढे दूरदृष्टी ठेवून नवोदित नेत्यांनी सर्व गोष्टीचा अभ्यास करून मराठवाड्याच्या झालेल्या उपेक्षेचे कारणे शोधून आता तरी स्थानिक नेत्यांनी राज्यकर्त्यांनी मराठवाड्याकडे आणि मराठवाड्यातील जनतेकडे लक्ष देऊन विकासाचा अनुशेष भरून काढणाऱ्या योजना राबवाव्यात अन्यथा काल मा काळ माफ करणार नाही.धन्यवाद!

-बोरसे गुरुजी 

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments