प्रति, माननीय संपादकजी,
विषय:-भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय योग्यच
भटक्या कुत्र्यांचा भयावह घटना पहाता याचिकाकर्त्यांला सर्वोच्च न्यायालयाने सुनावलेले उत्तर स्वागतार्ह आहे. मानवाच्या रक्षणार्थ भटक्या कुत्र्यांना रस्त्यावर खाऊ घालने अयोग्यच आहे.ज्यांना भटक्या कुत्र्यांची दया येत असेल त्यांनी आपल्या घरात खाऊ घालावे याचे स्वागत सर्वच स्तरातून केल्या जाईल.दया हे मानवीयदृष्टया महान कार्य आहे.परंतु यापोटी भटक्या श्वानांना खाऊ घालण्यावरून एखाद्याचा स्थानिक लोक छळ करीत असतील तर? नेमक्या अशा एका प्रकरणात छळापोटी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणाऱ्या याचिकाकर्त्यांला सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले व म्हणाले “अशा श्वानांना रस्त्यावर खाऊ घालण्यापेक्षा तुम्ही तुमच्या घरी का खाऊ घालत नाहीत?”असा सवाल न्यायालयाने केला.नोएडातील एका याचिका कर्त्याच्या सुनावणीमध्ये लावारीस कुत्र्यांच्या बाबतीत याचिकाकर्त्यांच्या वकिलाने म्हटले की प्राण्यांना खाऊ घालण्याच्या कामी आमच्या याचिकाकर्त्यांला त्रास होत आहे आम्ही पशु नियंत्रण नियमांतर्गत काम करीत असुनही आम्हाला का त्रास दिला जात आहे?यावर न्यायालयाने म्हटले की, आम्ही किती रस्ते आणि गल्ल्या पशुप्रेमीसाठी सोडायच्या? प्रत्येक ठिकाणी प्राण्यांसाठी जागा आहे.माणसांसाठी नाही.तुमच्या सारख्या ज्या लोकांना प्राण्यांचा पुळका असेल त्यांनी आपल्या घरात प्राण्यांसाठी निवासगृह सुरू करावे.सर्वच भटक्या कुत्र्यांना तुम्ही तीथेच खाऊ घाला.तुम्हाला हे करण्यापासून कोणी थांबवणार नाही.देशात भटक्या कुत्र्यांच्या अनेक ह्रुदयात व अंगावर शहारे येणाऱ्या घटना आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून व वर्तमानपत्रातुन पाहिल्या किंवा ऐकल्या आहेत.अशा परिस्थितीत भटक्या कुत्र्यांवर लगाम कसने काळाची गरज आहे.परंतु काही प्राणी प्रेमी रस्त्यावरील कुत्र्यांना खाऊ घालतात व याचा विपरीत परिणाम सर्वसामान्याना भोगावा लागतो.कारण कुत्र्यांना त्यांच्या वेळेवर खायला भेटले तर ठीक आहे;जर त्यांना वेळेवर जर खायला मिळाले नाही तर ते उग्र रूप धारण करतात.अशा परिस्थितीत पायदळ चालणारे, दुचाकी वाहन चालविणारे, शाळकरी मुले,सायकलस्वार अशांवर आक्रमन करतात व चावा घेण्याचा प्रयत्न करतात आपण चावा घेण्याच्या भयावह घटना वर्तमानपत्राच्या माध्यमातून किंवा मिडियाच्या माध्यमातून पाहिल्या आहेत.त्यामुळे प्राण्यांची सेवा करने वाईट नाही. प्राण्यांची सेवा केलीच पाहिजे परंतु त्यापासून कोणालाही नुकसान होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे.कारण ते मुके प्राणी आहेत.परंतु त्यांच्यापासून कोणालाही इजा किंवा त्रास होणार नाही हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. देशात तब्बल ६ करोड २० लाख भटक्या कुत्र्यांची संख्या आहे. त्यात महाराष्ट्राचा विचार केला तर १२ लाख ७६ हजार भटक्या कुत्र्यांची संख्या आहे.भारतात दरवर्षी कुत्रा चावल्याने २० हजार लोकांचा मृत्यू होतो असे एका अभ्यासात म्हटले आहे.भारतात सध्याच्या परिस्थितीत साप चालण्यापेक्षा कुत्र्याच्या चावण्याने जास्त लोक मरतात. रेबीजमुळे होणारे ३६ टक्के मृत्यू भारतात होतात.यावरून आपण समजू शकतो की कुत्र्यांचा चावा किती भयानक असतो व याचे दुष्परिणाम सर्वांच्याच समोर आहे.प्रशासन कुत्र्यांची नसबंदी कितपत करतात आणि किती सक्सेस होते यावरही प्रश्न चिन्ह उपस्थित होतो.आजही बऱ्याचशा राज्यात भटक्या कुत्र्यांची भयंकर दहशत आहे या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय योग्य आणि जनहितार्थ असल्याचे मी समजतो.त्याचबरोबर रस्त्यावर अनेक पशु रोडवर किंवा रोडच्या कडेला बसून असतात कधीकधी दुर्घटनाग्रस्त सुध्दा होतात यावरही सरकारने व स्थानिक प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करायला पाहिजेत.परंतु रस्त्यावरील कुत्र्यांच्या बाबतीत ज्यांना भावनिक किंवा जास्त काळजी वाटत असेल त्यांनी अशा भटक्या कुत्र्यांची व्यवस्था स्वतः करावी जेणेकरून त्यांचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होणार नाही.मुक्या जनावरांची सेवा करणे हा मानव धर्म आहे परंतु याचे विपरीत परिणाम व सर्वसामान्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. देशातील संपूर्ण राज्य सरकारांना विनंती आहे की भटक्या कुत्र्यांच्या भयावह घटना पहाता स्थानिक प्रशासनाच्या वतीने यावर योग्य उपाययोजना करावी.
-रमेश कृष्णराव लांजेवार
