Sunday, November 2, 2025
Homeऔरंगाबादनांदेड़ विभागात ‘राष्ट्रीय एकता दिवस’ साजरा सरदार वल्लभभाई...

नांदेड़ विभागात ‘राष्ट्रीय एकता दिवस’ साजरा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त नांदेड़ विभागात दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री प्रदीप कामले यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी एकता शपथ घेतली. सर्वांनी देशाच्या ऐक्य, अखंडता व सुरक्षेच्या जपणुकीसाठी स्वतःला वाहून घेण्याचा निर्धार व्यक्त केला. शपथविधीनंतर विभागीय कार्यालय परिसरात ‘एकता दौड (Run for Unity)’ आयोजित करण्यात आली. या दौडीत अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री राजेंद्र कुमार मीणा , इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आणि देशाच्या एकतेचा संदेश दिला. या कार्यक्रमाचा उद्देश राष्ट्रीय एकतेचा संदेश समाजामध्ये पोहोचवणे आणि देशाच्या प्रगतीसाठी सामूहिक जबाबदारीची जाणीव दृढ करणे हा होता.

नांदेड़ विभागात ‘राष्ट्रीय एकता दिवस’ साजरा

 

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त नांदेड़ विभागात दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी विभागीय रेल्वे व्यवस्थापक      श्री प्रदीप कामले यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी एकता शपथ घेतली. सर्वांनी देशाच्या ऐक्यअखंडता व सुरक्षेच्या जपणुकीसाठी स्वतःला वाहून घेण्याचा निर्धार व्यक्त केला.

 

शपथविधीनंतर विभागीय कार्यालय परिसरात ‘एकता दौड (Run for Unity)’ आयोजित करण्यात आली. या दौडीत अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री राजेंद्र कुमार मीणा इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आणि देशाच्या एकतेचा संदेश दिला.

 

या कार्यक्रमाचा उद्देश राष्ट्रीय एकतेचा संदेश समाजामध्ये पोहोचवणे आणि देशाच्या प्रगतीसाठी सामूहिक जबाबदारीची जाणीव दृढ करणे हा होता.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments