Monday, March 30, 2026
HomeUncategorizedगंगापूर प्रभाग क्रमांक (५) मध्ये सिमेंट रस्त्याचे कामाला सुरुवात नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण

गंगापूर प्रभाग क्रमांक (५) मध्ये सिमेंट रस्त्याचे कामाला सुरुवात नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण

गंगापूर प्रभाग क्रमांक (५) मध्ये सिमेंट रस्त्याचे कामाला सुरुवात नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण

दैनिक आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी/ गंगापूर शहरातील नगरपालिका अंतर्गत प्रभाग क्रमांक ५ जुना मांजरी रोड या परिसरात सिमेंट रस्त्याचे काम अत्यंत कासव गतीने सुरू होते यामुळे या परिसरातील नागरिकांना या रस्त्यावरून ये जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता दैनिक आत्ताच एक्सप्रेस वर्तमानपत्रात बातमी प्रसिद्ध करताच ठेकेदाराकडून बातमीची दखल घेत या परिसरातील रस्त्याच्या कामाला सुरुवात तात्काळ रस्ता बनवण्यात आला. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. मागील २० वर्षात गंगापूर शहराचा विकास झाला नाही परंतु मी माझ्या कार्यकाळात गंगापूर शहराचा चेहरा बदलला यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप भैय्या पाटील, यांनी दैनिक आत्ताच एक्सप्रेस चे प्रतिनिधी सुभान शहा यांच्याशी बोलताना सांगितले सत्तेसाठी नाही तर जनतेच्या विकासासाठी मी निवडणूक लढवली सत्ता असो नसो जनतेच्या हितासाठी मी एक पाऊल पुढे राहणार दैनिक आत्ताच एक्सप्रेस चे प्रतिनिधी शी बोलताना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप भैैय्या पाटील, यांनी सांगितलेे.  यावेळी कैलास गायकवाड, नागेश कवडे, रस्तेे बांधकाम ठेकेदार, व परिसरातील नागरिक उपस्थित होते.  मागील एक महिन्यापासून या परिसरातील सिमेंट रस्त्याचे काम बंद पडले होते. ठेकेदार याचा मनमानी कारभार असल्यामुळे हे काम होत नसल्याची चर्चा होती. या कामाला मुहूर्त लागणार का? या कामाची सुरुवात कधी होणार असा प्रश्न या परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला होता. या परिसरातील ५ ते ७ रस्त्याचे काम सुरू होते या रस्त्यावर खडी पसरून काम बंद करून देण्यात आले होते या रस्त्यावरून रात्रीचं नागरिकांना चालना म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे होते. दैनिक आत्ताच एक्सप्रेस ला बातमी प्रसिद्ध करताच रस्त्याच्या कामाला सुरुवात परिसरातील नागरिकाकडून बातमी प्रसिद्ध केल्या बद्दल दैनिक आत्ताच एक्सप्रेस चे प्रतिनिधी सुभान शहा, यांचा अभिनंदन करण्यात येत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments