उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते मंगळवारी
राष्ट्रवादी भवन पक्ष कार्यालयाचे उद्घाटन
छत्रपती संभाजीनगर– राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रवादी भवन पक्ष कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार सतीश चव्हाण यांनी दिली.
शहरातील जिल्ला हॉस्पीटलशेजारी, सेव्हल हील ते सेंट्रल नाका रोडजवळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने नवीन पक्ष कार्यालय सुरू करण्यात आले आहे. मंगळवारी (दि.16) दुपारी 1 वा. या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर दुपारी 3 वा. संत एकनाथ रंग मंदिर येथे अंबड-घनसावंगी विधानसभेचे माजी आमदार शिवाजीराव चोथे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
तरी याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन असे आवाहन जिल्हाध्यक्ष आमदार सतीश चव्हाण, शहराध्यक्ष अभिजीत देशमुख यांनी केले आहे.
