अतिवृष्टीचे पिक विम्याची रक्कम तात्काळ लाभार्थ्याच्या खात्यावर जमा करा – भाऊसाहेब गवळी
आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर /प्रतिनिधी/ भेंडाळा जामगाव मंडळसह संपूर्ण गंगापूर तालुक्यातील शेती पिकाचे १००% नुकसान झालेले आहे तरी अतिवृष्टीची पिक विम्याचे अनुदान व घराची पडझड पैसे तात्काळ शेतकऱ्याच्या लाभात्याच्या खात्यात टाका अतिवृष्टीमुळे गंगापूर तालुक्यातील शेतकरी खूप अडचणीत सापडलेला आहे शासनाने दिवाळीपूर्वीच मदत दिली जाईल अशी घोषणा केली होती परंतु कालची एक प्रकारे दिवाळी अंधारात साजरी करायला भाग पाडले शासनाने फक्त घोषणाचा पाऊस पडला पण प्रत्यक्षात मदत शेतकऱ्याच्या खात्यावर तत्काळ नुकसान भरपाईचे पिक विम्याचे व घराची पडझडीचे पैसे तातकाळ टाकावे नसता कायगाव गोदावरी नदीमध्ये सामूहिक जलसमाधी करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील असे पत्र गंगापूर तहसीलदार नवनाथ वगवाड यांना दिले त्यावेळी भाऊसाहेब गवळी कायगावकर बापूसाहेब गायकवाड निलेश काने भागचंद नजन गणेश गायकवाड किशोर गायकवाड ज्ञानेश्वर चंद्रभान गायकवाड नंदकिशोर बागल बाळासाहेब गायकवाड अण्णासाहेब पिके गणेश मिसाळ बद्रीनाथ मिसाळ गोकुळ दापटे आदी शेतकरी हजर होते.