ब्रह्मकमळ फुलाचे वृक्षारोपण करून केली जयंती साजरी
कन्नड/प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथील निसर्ग मित्र देविदास थोरात व ज्येष्ठ नागरिक अण्णा शिंदे यांनी जागृत देवस्थान भिकनशावली बाबा यांच्या परिसरात २५ डिसेंबर रोजी अटल बिहारी वाजपेयी (पंतप्रधान) यांच्या जयंतीनिमित्त ब्रह्मकमळ फुलांचे दहा वृक्ष लावून विनम्र अभिवादन केले. २५ डिसेंबर रोजी त्यांची जयंती साजरी होत असून २५ डिसेंबर हा दिवस (सुशासन दिन) म्हणूनही ओळखले जाते . ते एक महान नेते, कवी आणि आपल्या भारत देशाचे दहावे पंतप्रधान होते, ज्यांनी लोकशाही, राष्ट्रनिष्ठा आणि नैतिकतेचा वारसा दिला. त्यांचे जीवन समर्पण आणि देशासाठी केलेल्या योगदानाचे अविस्मरणीय ठरले आहे. तसेच दूरदृष्टीचे राजकारणी होते. ज्यांनी आपल्या देशाचे तीन वेळा पंतप्रधान पद भूषवले आणि नैतिक मूल्यावर आधारित राजकारणाचे उदाहरण दिले. ते एक उत्तम वक्ते होते. तसेच जनसंघाचे संस्थापक सदस्य आणि भाजपचे जेष्ठ नेते देखील होते. ज्यांनी देशाच्या विकासासाठी आपले जीवन समर्पित केले अशा महामानवास सर्व देशवासीयांना अभिमान व गर्व आहे त्यांच्या जयंती निमित्त ब्रह्मकमळ फुलाचे दहा वृक्षारोपण करून निसर्ग मित्र व ज्येष्ठ नागरिक यांनी जयंती साजरी केली. त्यांनी केलेल्या या जयंतीनिमित्त वृक्षारोपणाचे सर्वत्र परिसरातून कौतुक होत आहे. मला नेहमी महापुरुष, महामानव, देशभक्त सैनिक यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण उपक्रम करून जयंती साजरी करताना आनंद वाटतो त्यामुळे नेहमी मी अशी उपक्रम राबवतो आणि राबवीत राहील असे मत निसर्ग मित्र देविदास थोरात यांनी व्यक्त केले. या अगोदर अनेक वेळा गावांमध्ये विविध महापुरुषांच्या महामानवांच्या राजे महाराजांच्या जयंतीनिमित्त मी विविध उपक्रम राबविले आहे व वृक्षारोपण देखील केले आहे. जयंती निमित्त काहीतरी स्तुत्य उपक्रम राबवला तर देशाच्या समाजाच्या उपयोगी पडते. त्यांच्या प्रेरणेतून आपण केलेल्या कामाचा आनंदही होतो.