फुलंब्री तालुक्यात थंडी वाढली, नागरिकांची शेकोटीजवळ धाव
फुलंब्री/प्रतिनिधी/ फुलंब्री शहर व ग्रामीण भागात थंडी वाढली आहे, थंडी पासुन बचवासाठी नागरिक शेकोटी जवळ धाव घेत आहे.
सध्या डिसेंबर महिना सुरु आहे, आजुनही दोन ते अडीच महिने थंडी राहील असे सांगितले जात आहे.
सध्या रब्बी हंगाम सुरु आहे सगळीकडे शेतकरी रब्बी हंगामातील पिकांची पेरणी केली असल्याने थंडीत गहु हरभरा व इतर पिकांना पाणी देण्यात येत आहे.
सध्या सगळीकडे थंडी वाढली असल्याने फुलंब्री शहरातील नागरिक स्वेटर जॉकेट, मफलर, टोपी घालत आहे.
तसेच उबदार कपडे घालत आहे.
फुलंब्री नगरपंचायतीची निवडणुकीची धामधुम सुरु असल्याने शहरातील नागरिक थंडीतही गरमागरम चर्चा करत आहे.
येत्या २० डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याने आतापासुनच राजकीय गरमा गरम चर्चा रंगत आहे.